Indian Army presents 54-year-old proof highlighting historical US support to Pakistan, referencing Trump’s remarks.  esakal
देश

Indian Army and USA: भारतीय सैन्याने ५४ वर्षांपूर्वीचा 'तो' पुरावा उघड करत, ट्रम्प यांना थेट आरसाच दाखवला!

Indian Army reveals 54-year-old proof exposing US support to Pakistan: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आरोप करत, भारतीय वस्तूंवर जादा टॅरिफ लावणार असल्याची धमकी दिलेली आहे, यानंतर भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर देणं सुरू केलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Indian Army Reveals Historic 54-Year-Old Evidence How the US Supported Pakistan: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टॅरिफबाबत दररोज मोठे निर्णय जाहीर करत आहेत, अन् विधानंही करत आहेत. कालच ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य करत, काही आरोप केले होते. ज्यावर भारताकडूनही कालच सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. त्यानंतर आता भारतीय सैन्यानेही अमेरिकेला आरसा दाखवला आहे.

भारतीय सैन्याने अमेरिकेला पाच दशकांहून अधिक काळ आधीच्या म्हणजे ५४ वर्षांपूर्वीची एका घटनेची आठवण करून दिली आहे. भारतीय सैन्याने आज १९७१मध्ये प्रकाशित एका वृत्तपत्राचं एक कात्रण शेअर करत, अमेरिकेवर निशाणा साधला आहे. यामध्ये दाखवलं गेलं आहे की, अमेरिका कशाप्रकारे अनेक दशकांपासून पाकिस्तानचं समर्थन करत आहे.

भारतीय सैन्याची पोस्ट यासाठी महत्त्वाची आहे, कारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने, भारतीय वस्तूंवर जादा टॅरिफ लावणार असल्याची धमकी दिली आहे. भारतातून येणाऱ्या वस्तूंवर जादा टॅरिफ आकारले जाईल, असा ट्रम्प यांनी इशारा दिला होता. मात्र अमेरिका स्वत:चा भूतकाळ कसा होता, हे विसरला आहे.

भारतीय सैन्याची नेमकी पोस्ट काय? –

टॅरिफबाबत सुरू असलेल्या वादंगादरम्यान ट्रम्प सरकारला आरसा दाखवत, भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडने ५ ऑगस्ट १९७१ रोजी प्रकाशित एका वृत्तपत्रामधील कात्रण शेअर केलं आहे. त्या कात्रणात तत्कालीन संरक्षणमंत्री विद्याचरण शुक्ला यांच्याद्वारे राज्यसभेत करण्यात आलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख केला गेला आहे. तेव्हा शुक्ला यांनी नाटो शक्तिंद्वारे पाकिस्तानी सैन्यास संभाव्य शस्त्र पुरवठ्याबाबत संसदेत विधान केलं होतं. यामध्ये सांगितलं गेलं आहे की, कशाप्रकारे अमेरिका १९७१च्या युद्धाच्या तयारीसाठी दशकांपासून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा करत होता. भारतीय सैन्याने आपल्या पोस्टसोबत कॅप्शन लिहिले आहे की, ‘’आजचा दिवस, युद्धाच्या तयारीचे ते वर्ष – ५ ऑगस्ट १९७१’’

 अमेरिकेने केला होता शस्त्रांचा पुरवठा -

विद्याचरण शुक्ला यांनी तेव्हा राज्यसभेत दिल्या गेलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, कशाप्रकारे पाकिस्तानला शस्त्रांच्या पुरवठ्याबाबत नाटो आणि सोवियत संघाशी संपर्क साधला गेला होता. तसेच रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, सोवित संघ आणि फ्रेंच सरकारने पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करण्यास नकार दिला होता. परंतु अमेरिकेने मात्र पाकिस्ताना आपला पाठिंबा कायम ठेवला होता. याशिवाय त्यामध्ये असंही म्हटलं गेलं आहे की, तेव्हा अमेरिका आणि चीन दोघांनही पाकिस्तानला अतिशय कमी किमतीत शस्त्र विक्री केली होती. यात एका रिपोर्टचाही हवाला दिला गेला आहे, की अमेरिकेकडून पाकिस्तानला १९५४ नंतर पासून जवळपास दोन अब्ज डॉलरच्या शस्त्रांचा पुरवठा केला गेला आहे.

ट्रम्पची पाकिस्तनावर मेहरनजर -

तसं तर सध्या अमेरिका आजही पाकिस्तानला झुकतं माप देत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. पाकिस्तानावर लावण्यात आलेल्या टॅरिफमधून हे स्पष्ट झालं आहे. अशातच अमेरिकेने जे टॅरिफ लावले आहे, त्यामध्ये पाकिस्तानला मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प सरकारने पाकिस्तानवरील टॅरिफमध्ये २९ टक्क्यांवरून १९ टक्क्यांपर्यंत घट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार की नाही? सरकारला विचारणा करत भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! अकलूजमधील गुन्हेगारांच्या टोळीतील ‘या’ १३ जणांवर ‘मोक्का’चे कलम; तडीपार करूनही वर्तनात सुधारणा नाही

Latest Marathi News live Updates : कुर्डूवाडी-परांडा वाहतूक बंद, अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित

Dhirendra Shastri : गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा, कारण...धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! आता बॅंकेत त्याच दिवशी क्लिअर होणार धनादेश (चेक); ‘आरबीआय’चे सर्व बॅंकांना परिपत्रक; खात्यात पैसे ठेवूनच द्यावा लागणार त्या तारखेचा चेक

SCROLL FOR NEXT