Indian Army Kills 6 Terrorists in Kupwada esakal
देश

Indian Army : जम्मू-कश्मीरमध्ये 24 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरूय.

जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दल (Security Forces) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) मोठी चकमक सुरूय. गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. गुरुवारी सकाळी कुपवाडामध्ये (Kupwada) घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलंय. या चकमकीत लष्कराचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना (Jammu and Kashmir Police) कुपवाडा येथील जुमागुंड गावातून (Juma Gund village) काही दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नाकाबंदी केली. त्यानंतर चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय. आयजीपी काश्मीर यांनी सांगितलं की, मारले गेलेले दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित होते. दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

बुधवारी तिघांना कंठस्थान

जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला इथं पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या चकमकीत जम्मू-कश्मीर पोलिसांचा एक जवानही शहीद झाला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानचे (Pakistan) होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT