Boat Arrest Sakal
देश

लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरून 2 बोटींसह 1520 कोटींचे ड्रग्स जप्त; पाहा व्हिडीओ

भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर दोन बोटींना ताब्यात घेतले आहे.

दत्ता लवांडे

कवरत्ती : भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) जवानांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर दोन बोटींना ताब्यात घेतले आहे. त्या बोटींमधून जवळपास 1520 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि महसूल गुप्तचर संचलनालयासोबत सुरू केलेल्या 'खोजबीन' या संयुक्त मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

समुद्रामार्गे होत असलेल्या अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महसूल गुप्तचर संचलनालय यांनी संयुक्तपणे एक मोहिम राबवली आहे. 'खोजबीन' असं या मोहिमेचं नाव असून त्यांच्या या संयुक्त मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचं भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सांगितलं आहे. दरम्यान लक्षद्वीप बेटांच्या किनाऱ्याजवळ त्यांना दोन संशयित बोटी आढळल्या होत्या. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीने त्यांचा पाठलाग सुरू केला. प्रिन्स आणि लिटल जिझस असं या बोटींचं नाव होतं.

जवानांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे 1520 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले. त्यानंतर त्या दोन्ही बोटींसह 1520 कोटींचा मुद्देमाल जवानांकडून जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच पुढील तपास सुरू असल्याचं तटरक्षक दलांच्या जवानांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी; भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये रास्ता रोको, ट्रॅक्टर-बैलगाड्यांसह ग्रामस्थ रस्त्यावर

Dhamangaon Farmer Case: संसाराचा गाडा हाकणारा आधारवड कोलमडला; ५२ वर्षीय शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं

Google वर एक स्टार रिव्ह्यू; कंपनीने महिलेवरच दाखल केला मानहानीचा दावा... काय आहे प्रकरण?

Marathi News Live Updates : मोदी सरकारच्या १२ वर्षात मृत्यू स्वस्त झाला; संजय राऊत यांचा घणाघात

Rahul Gandhi Shirt Shoes Brand : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमानंतर शर्ट-शूजची चर्चा; ब्रँड कोणता, किंमत किती? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT