Driving License Driving License
देश

तब्बल १५ देशांमध्ये चालते भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स

भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्सला मान्यता देणारे देश कोणते? हे जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही प्रकारचे वाहन चालविण्यासाठी लायसेन्सची (Indian driving license) गरज असते. लायसेन्सशिवाय गाडी चालवणे अवैध आहे. यामुळे वाहन चालकांवर कारवाई केली जाते. हा नियम प्रत्येक देशासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आहेत. ज्या देशाचे लायसेन्स त्याच देशात वैध मानले जाते. दुसऱ्या देशात ते चालत नाही. मात्र, जगातील १५ देश (Runs in 15 countries) असे आहेत जिथे भारतीय लायसेन्स (You Can Drive) चालतात. चला तर जाणून घेऊया या विषयी...

यूएस (US), जर्मनी (Germany), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि यूकेसह जगातील १५ देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्सने गाडी चालवण्याची परवानगी मिळते. या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा परमिटची (IDP) गरज भासत नाही. विशिष्ट ड्रायव्हिंग लायसेन्सची चिंता न करता त्या देशात प्रवास करू शकतो. नवीन शहर किंवा देशाबद्दल अधिक जाणून घेण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे कारमध्ये फिरण्यासाठी किंवा बाइक चालवण्यासाठी जागा शोधणे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे करू शकता. भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्सला मान्यता देणारे देश कोणते? हे जाणून घेऊया.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

यूएसएमधील बहुतेक राज्य भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्सने भाड्याने कार चालविण्याची परवानगी देतात. येथे एक वर्षाच्या कालावधीसाठी गाडी चालवता येते. परंतु, कागदपत्रे योग्य आणि इंग्रजीत असल्याची खात्री करा.

फिनलंड आणि सिंगापूर

फिनलँडमध्ये प्रवेश करण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे. येथे भारतीय लायसेन्स विम्याच्या आधारावर सहा ते बारा महिन्यापर्यंत वैध आहे. तसेच सिंगापूरमध्ये वाहन चालवण्यासाठी वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. येथेही एक वर्षासाठी लायसेन्स वैध आहे.

जर्मनी

भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्सने जर्मनीत सहा महिन्यांसाठी गाडी चालवता येते. जर्मन लोक रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवतात. यासाठी लायसेन्सची जर्मन भाषांतरित प्रत जवळ बाळगावी लागते.

ऑस्ट्रेलिया

न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड, दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी आणि नॉर्दर्न टेरिटरी या रस्त्यांवर तीन महिन्यांसाठी गाडी चालवू शकता. यासाठी लायसेन्स इंग्रजीत असायला हवा.

युनायटेड किंगडम

इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडसह युनायटेड किंगडम (यूके) रस्त्यावर एक वर्षासाठी गाडी चालवू शकता. युनायटेड किंगडम फक्त विशिष्ट वाहनांना परवानगी देते.

कॅनडा

कॅनडात भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स ६० दिवसांसाठी वैध आहे. या देशात कार चालवण्यासाठी तुमच्याकडे कॅनेडियन ड्रायव्हिंग लायसेन्स असणे आवश्यक आहे.

न्युझीलँड

एक वर्षासाठी न्यूझीलंडमध्ये गाडी चालवू शकता. मात्र, देशात कार चालवण्यासाठी तुमचे वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे.

स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिका

स्वित्झर्लंडमध्ये एक वर्षासाठी भारतीय लायसेन्स वैध आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लायसेन्सने कार चालवू शकता. काही कार भाड्याने देणाऱ्या एजन्सी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसेन्स मागू शकतात.

हाँगकाँग व स्वीडन

हाँगकाँगमध्ये एक वर्षापर्यंत कायदेशीररीत्या कार चालवू शकता. तसेच स्वीडनमध्ये कार चालवण्यासाठी लायसेन्स इंग्रजी, स्वीडिश, जर्मन, फ्रेंच किंवा नॉर्वेजियन भाषेत असणे आवश्यक आहे. येथेही एक वर्षासाठी गाडी चालवता येते.

मलेशिया आणि भूतान

मलेशियात वाहन चालवण्यासाठी भारतीय लायसेन्स इंग्रजी किंवा मलय भाषेत असणे आवश्यक आहे. भूतानमध्ये भारतीय नागरिक भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्ससह चारचाकी किंवा दुचाकी चालवू शकतात.

स्पेन

भारतीय ड्रायव्हिंग लायसेन्स धारक म्हणून रेसिडेन्सीसाठी नोंदणी केल्यानंतर सहा महिने स्पेनच्या रस्त्यावरून गाडी चालवू शकता. यासाठी लायसेन्स इंग्रजीत असावा आणि स्वीकृत आयडी पुरावा सोबत असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT