ATAGS
ATAGS 
देश

DRDOच्या भात्यात जगातील सर्वोत्तम हॉवित्झर तोफ; शत्रूंना भरणार धडकी!

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- ओडिशाच्या बालासोरामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (DRDO) स्वदेशी बनावटीच्या ATAGS हॉवित्झर तोफांचे परीक्षण झाले. हे परिक्षण बालासोर फायरिंग रेंजमध्ये झाले. डीआरडीओच्या एका वैज्ञानिकाने सांगितले की, ''ही जगातील सर्वात चांगली तोफ आहे. याची क्षमता 48 किलोमीटर दूरवर असणाऱ्या लक्ष्यावर प्रहार करण्याची आहे. ATAGS हॉवित्झर स्वदेशी तोफ भारतीय सैन्याच्या 1800 आर्टिलरी गन सिस्टमची आवश्यकता पूर्ण करु शकते.'' 

निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये एकट्या ममतादिदी राहतील; अमित शहांची बोचरी टीका

हॉवित्झर एटीजीएस तोफांनी चीन सीमेच्या जवळ सिक्किम आणि पाकिस्तानी सीमेच्या जवळ पोखरण येथे 2 हजार राऊंड फायरिंग केले. फील्ड ट्रायलदरम्यान डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक आणि एटीएजीएस प्रोजेक्टचे डायरेक्टर शैलेंद वी गाडे यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली.  ATAGS हॉवित्झर तोफा भारतीय सैन्यातील बोफोर्स आणि जगातील कोणत्याही अन्य तोफांपेक्षा शक्तीशाली आहेत. इस्त्राईलच्या एटीएचओएसपेक्षाही या तोफा चांगल्या आहेत. 

अॅडवान्स टोड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) डीआरडीओने विकसित केले आहे. भारत फोर्ज आणि टाटा अँडवान्स सिस्टिम्स लिमिटेडद्वारा या तोफांची निर्मिती करण्यात आली आहे. गाडे पुढे म्हणाले की, भारतीय सैन्याला 1580 तोफांची आवश्यकता आहे. याशिवाय 150 एटीएजीएस आणि 114 धनुष तोफांची आवश्यकता आहे. भारताला एकूण 1800 तोफांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीचं एटीएजीएस तोफा प्रदर्शन दाखवत आहेत, मला विश्वास आहे की 1800 तोफांची आवश्यकता पूर्ण होईल. 

ATAGS हॉवित्झर तोफांमुळे चीनसारख्या शत्रूविरोधात भारताला मोठी आघाडी मिळणार आहे. भारतीय स्वदेशी तोफा 48 किलोमीटरच्या प्रहार क्षमतेसह जगातील सर्वात दूर हल्ला करण्याची ताकद ठेवतात. शत्रू आपला सामना करुच शकणार नाही, कारण त्यांच्या तोफांचे गोळे आपल्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. पण आपण 48 किलोमीटरच्या क्षमतेसह त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, असंही गाडे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT