Indian Railways launches Festival Rush Scheme offering 20% off on round trip tickets to make festive travel affordable.  esakal
देश

Indian Railway Scheme: सणासुदीच्या काळात रेल्वेकडून सर्वसामान्य प्रवाशांना मोठी भेट!

Indian Railways offers discount on round trip tickets: राउंड ट्रीप तिकिटांवर आता मिळणार मोठी सूट; मात्र जाणून घ्या, नेमक्या काय आहेत अटी?

Mayur Ratnaparkhe

Indian Railways discount News: सणासुदीच्या काळात रेल्वे तिकिटांसाठी होणाऱ्या गर्दीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवीन योजना सुरू केली आहे. त्याचे नाव "राउंड ट्रिप पॅकेज फॉर फेस्टिव्हल रश" आहे. या योजनेअंतर्गत, जर प्रवाशांनी येण्याचे आणि जाण्याचे असे दोन्ही तिकिट एकत्र बुक केले तर त्यांना परतीच्या तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०टक्के सूट मिळणार आहे.

गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. या योजनेचा फायदा अशा प्रवाशांना होईल जे निर्धारित कालावधीत परतीचा प्रवास बुक करतील. ये-जाण्यासाठी दोन्ही तिकिटे एकत्र बुक केली असतील आणि प्रवासी तेच असतील तरच ही सवलत मिळेल. 

तिकीट बुकिंग १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. परतीच्या प्रवासाची तारीख १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान असावी. ही ऑफर फक्त कन्फर्म तिकिटांवरच लागू असेल. सवलत फक्त मूळ भाड्यावरच मिळेल, इतर शुल्कांवर नाही.

तिकीट बुकिंग ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवरून करता येईल. रेल्वेने स्पष्ट केले आहे की या योजनेअंतर्गत बुक केलेल्या तिकिटांमध्ये कोणताही बदल, रद्दीकरण किंवा इतर सवलत कूपनचा वापर केला जाणार नाही. ही सुविधा सर्व क्ला आणि बहुतेक रेल्वेगाड्यांवर लागू असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : नागपूरमध्ये कोराडी मंदिराचं निर्माणाधीन लोखंडी गेट कोसळलं, १५ मजूर जखमी, स्लॅब टाकण्याचे सुरू होते काम

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश, कारण काय?

Chandrashekhar Bawankule : महसूल–पोलीस संगनमत उघड! वाळू माफियांना मिळते सरकारी पाठबळ? मंत्र्यांच्या थेट कबुलीनं चर्चांना उधाण...

Donald Trump : टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाचा केला वापर? नियमाचा घेतला गैरफायदा, वाचा काय आहे प्रकरण?

Thane Politics: ठाण्यात राज ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या शिंदेसेनेचं बळ वाढलं

SCROLL FOR NEXT