Indian Railways introduces a new rule making Aadhaar verification mandatory for online ticket booking on IRCTC, aiming to enhance passenger identification and prevent misuse.
IRCTC online ticket booking : भारतीय रेल्वेने त्यांच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये एक मोठा बदल केला आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश तिकीट बुकींगमध्ये होणारी फसवणूक रोखणे आणि खऱ्या प्रवाशांना प्राधान्य देणे आहे. आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवरून सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत तिकीट बुक करण्यासाठी आता आधार पडताळणी अनिवार्य आहे. हा नवीन नियम २८ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे.
तिकिट बुकिंगसाठी आधार कार्ड आवश्यक करण्याची रेल्वेची ही पहिलीच वेळ नाही. १ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकिटांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर, १५ जुलैपासून एजंट आणि पीआरएस काउंटरवर ऑनलाइन ओटीपी-आधारित आधार पडताळणी प्रणाली लागू करण्यात आली. हा नवीन नियम विशेषतः सकाळच्या वेळेच्या स्लॉटसाठी आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता आणि नियंत्रण सुनिश्चित होते.
सकाळी ८ ते १० या वेळेत बहुतेक लोक कामासाठी किंवा प्रवासासाठी तिकिटे बुक करतात. विशेषतः लोकप्रिय गाड्यांमध्ये जागांची मागणी झपाट्याने वाढते. अशावेळी एजंट अनेकदा अनेक खात्यांचा वापर करून तिकिटे ब्लॉक करतात, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, रेल्वेने निर्णय घेतला आहे की, या दोन तासांमध्ये फक्त आधार पडताळणी करणारेच प्रवाशी तिकिटे बुक करू शकतील. ज्या प्रवाशांनी अद्याप त्यांचे आधार लिंक केलेले नाही ते उर्वरित दिवसांत तिकिटे बुक करू शकतील.
या निर्णयाबाबत रेल्वेने म्हटले आहे की, हे पाऊल तिकीट प्रणाली अधिक सुरक्षित आणि प्रवासी अनुकूल बनवण्याच्या उद्देशाने आहे. यामुळे केवळ फसवणूक रोखली जाणार नाही, तर फसव्या बुकिंग, कॅन्सलेशन आणि अयशस्वी देवाण-घेवाणीच्या घटना देखील कमी होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.