Prime Minister Narendra Modi congratulates the Indian Women’s Cricket Team for their World Cup victory during a special meeting at his residence in New Delhi.
esakal
Indian Women’s Cricket Team and PM Modi meeting : पंतप्रधान मोदींनी आज (बुधवार) नवी दिल्लीमधील लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत केले. पंतप्रधानांनी यावेळी महिला संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सलग तीन पराभव आणि सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर स्पर्धेत त्यांच्या प्रभावी पुनरागमनाचे कौतुकही केले.
याप्रसंगी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने २०१७मध्ये पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीच्या आठवणीला उजाळा दिला. जेव्हा ती चषकाशिवाय पंतप्रधानांना भेटली होती. त्यानंतर आता जेव्हा ती विश्वकप घेऊन पंतप्रधानांना पुन्हा भेटली, तेव्हा ती प्रचंड आनंदी दिसून आली. यावेळी भारतीय महिला संघाने पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केलेली एक जर्सी भेट दिली.
पीटीआयने वृत्त दिले आहे की, उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाल्या की पंतप्रधानांनी तिला प्रेरणा दिली आहे आणि ते सर्वांसाठीच प्रेरणा राहिले आहेत. तिने हेही सांगितले की, कशाप्रकारे आजच्या मुली सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत आणि हे पंतप्रधानांमुळे आहे. तर दीप्ती शर्मा म्हणाली की ती पंतप्रधानांना भेटण्यास उत्सुक होती. यावेळी तिने २०१७मधील भेटीची आठवण काढली, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना कठोर परिश्रम करत राहण्यास आणि आपले स्वप्न साकार करण्यास सांगितले होते. दीप्ती शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जय श्रीराम लिहिले होते आणि तिच्या हातावर हनुमानाचा टॅटू आहे. तिने सांगितले की, यामुळे तिला शक्ती मिळते.
या भेटीदरम्यान कर्णधार हरमनप्रीत हिने पंतप्रधान मोदींना ते नेहमीच वर्तमानात कसे राहतात, असा प्रश्न विचारला. तर यावर पंतप्रधानांनी सांगितले की, असे असणे त्यांच्या जीवनाचा भाग आहे आणि ती त्यांची सवय झाली आहे. पंतप्रधान मोदींनी २०२१मध्ये इंग्लड विरुद्ध हरलीनने टिपलेल्या झेलाचीही आठवण काढली, ज्याबाबत त्यांनी त्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
याचबरोबर पंतप्रधान मोदींनी हेही सांगितले की, कशाप्रकारे हरमनप्रीतने अंतिम सामना जिंकल्यानंतर चेंडू आपल्या खिशात टाकला. मोदी म्हणाले, की ती भाग्यवान होती की चेंडू तिच्याकडे आला आणि तिने तो तिच्याजवळच ठेवला. यावेळी मोदींनी अमनजोत कौरच्या आतापर्यंतच्या सर्वात खास कॅचबाबतही चर्चा केली, जो तिने अनेकदा सुटल्यानंतरही पकडला होता.
मोदींनी सांगितले की, त्यांना ही एक अशी धडपड आहे जी पाहणे त्यांना आवडते. मोदी म्हणाले की, कॅच पकडताना तुम्हाला चेंडू दिसत असेल परंतु कॅच पकडल्यानंतर तुम्हाला ट्रॉफी दिसत असेल. तर यावेळी क्रांती गौड यांनी सांगितले की, कसा त्यांचा भाऊ पंतप्रधानांचा फार मोठा चाहता आहे, ज्यावर मोदींनी तत्काळ त्यांना भेटीचे खुले आमंत्रण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.