Sajeed Tarar And PM Narendra Modi  Esakal
देश

PM Modi: पाकिस्तानलाही मोदींसारखा नेता... कोण आहे पंतप्रधानांचे कौतुक करणारा अब्जाधीश

Sajid Tarar: या उद्योगपतीने यापूर्वी गव्हर्नर्स वित्त समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे आणि अनेक गुंतवणूक गट आणि संस्थांचे अध्यक्ष आहेत.

आशुतोष मसगौंडे

देशात यंदाच्या लोकसभा निवडणुका आता शेवटाकडे जात असून, सातपैकी चार टप्प्यांतील जागांवर मतदान झाले असून, आणखी तीन टप्प्यांतील जागांवर मतदान बाकी आहे. अशात भारताबरोबर परदेशाततही अनेकजन पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जिंकणार असा दावा करत आहेत.

दरम्यान पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत भारत-आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Sajid Tarar Praises PM Modi)

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उद्योगपती साजिद तरार म्हणाले की, एक दिवस पाकिस्तानलाही पंतप्रधान मोदींसारखा नेता मिळेल. तरार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठिण परिस्थितीत पाकिस्तानला भेट दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी पाकिस्तानशी संवाद आणि व्यापार सुरू करतील अशी आशा आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात तरार म्हणाले की, शांततापूर्ण पाकिस्तान भारतासाठीही चांगले असेल.

कोण आहेत साजिद तरार?

साजिद तरार यांच्या वेबसाइटनुसार, ते 1990 च्या दशकात अमेरिकेत गेला आणि अमेरिकन नागरिक झाले. साजिद हे बाल्टीमोर येथील पाकिस्तानी अमेरिकन उद्योगपती, ट्रम्प समर्थक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत.

ते "अमेरिकन मुस्लिम फॉर ट्रम्प" संस्थेचे संस्थापक आहेत. साजिद हे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवर सल्लागार होते. त्यांनी बाल्टिमोर येथील ना-नफा खाजगी संस्था सेंटर फॉर सोशल चेंजचे सीईओ पदही भूषवले आहे. बाल्टिमोर स्कूल ऑफ लॉ विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे.

साजिद यांनी यापूर्वी गव्हर्नर्स वित्त समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे आणि अनेक गुंतवणूक गट आणि संस्थांचे अध्यक्ष आहेत.

भारत-पाकिस्तान संबंध

दरम्यान 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अचानक पाकिस्तानला भेट देत दोन्ही देशांतील संबंध सुरण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, तसे होऊ शकले नाही.

पाकिस्तानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून राजकीय अस्वस्थता आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत. तर नुकतेच देशात निवडणुका होऊन नवे सरकार सत्तेत आले आहे. यासह देश अनेक समस्यांसह अर्थिक संकटाचा सामना करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी लग्न करशील?' शाहरुखने लग्नाच्या 15 वर्षानंतर प्रियंका चोप्राला लग्नासाठी घातलेली मागणी, प्रपोजल ऐकून थक्क झाली प्रियंका

Vastu Tips: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

Latest Marathi News Update : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात,दोघांचा मृत्यू

Whale Vomit 3 Crore : बाप रे! तब्बल ३ कोटींची व्हेलच्या उलटीची तस्करी, माशाची उलटी एवढी महाग का?

India vs Australia: जॉश हेझलवूडची अनुपस्थिती पथ्यावर? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होबार्टमध्ये तिसरा टी-२० सामना

SCROLL FOR NEXT