Rajkumar
Rajkumar 
देश

बाळाला कुशीत घेऊन 7 तास फिरत होतो बाप; उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू

पीटीआय

नोएडा- नुकत्याच जन्मलेल्या एका बाळाचा वेळत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पित्याने बाळाला हातात घेऊन अनेक दवाखाण्यांचे दार गाठले. पण उपचार मिळू न शकल्याने चिमुकल्याने आपल्या पित्याच्या कुशीतच आपला जीव सोडला आहेत. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील ही घटना आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बाळाचे पिता राजकुमार हे एका कारखाण्यात काम करतात. कृष्णा लाईफ लाईन रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रात्री दहा वाजता बाळाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, रुग्णालयात वेंटिलेटरची सुविधा नसल्याचे सांगत बाळाला डिस्चार्ज देण्यात आला.

बाळाला ग्रीन सिटी रुग्णालयात घेऊन जाण्यास सुचवण्यात आले. मात्र, रुग्णालयाने मोठा खर्च होणार असल्याचं सांगितल्याने आणि ती करण्याची ऐपत नसल्याने राजकुमार यांनी बाळाला सरकारी दवाखाण्यात नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रात्री 11 वाजता रुग्णवाहिकेला फोन केला तेव्हा ती दिड तासानंतर आली. रुग्णवाहिकेतून बाळाला दादरी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर उपस्थित नव्हते. आणि जे उपस्थित होते ते कुंभकर्णी झोपेमध्ये होते. बादलपुर आरोग्य केंद्राचीही हीच अवस्था होती.

रात्र अशीच निघून जात होती पण बाळाला उपचार मिळत नव्हता. पिता राजकुमार बाळाचा उपचार होईल असं रुग्णालय शोधत होते. सकाळी पाच वाजता रुग्णवाहिका बाळाला घेऊन नोएडाच्या सरकारी रुग्णालयात पोहोचली. पण तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. चिमुकल्याने आपल्या बापाच्या कुशीतच प्राण सोडला होता. इतकी उपेक्षा झाल्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाला जाग आली नाही. कारण बाळाचा मृतदेह घेऊन पित्याला मोटरसायकलवर नोएडावरुन ग्रेटर नोएडाला यावं लागलं.

नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा मृत्यू पाहिल्याने राजकुमार आणि त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला. राजकुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आक्रोश व्यक्त केला व न्याय देण्याची मागणी केली. मुद्दा गाजत असल्याचं जाणवताच आरोग्य विभागाने डोळे उघडले. गौतम बुद्ध नगरचे सीएमओ डॉक्टर दिपक ओहरी यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांनी राजकुमार यांच्या घरी जाऊन त्यांचा जवाब नोंदवला आहे. मात्र, बाळाचा जीव गेल्यानंतर क्रियाशीलता दाखवून आरोग्य विभागाला काय साधायचं आहे, असा सवाल विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT