International Men's Day 2022
International Men's Day 2022 esakal
देश

International Men's Day 2022 : इथे पुरुषांना मिळतो न्याय; पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांची संघटना

सकाळ डिजिटल टीम

International Men's Day 2022 : घरात सासू सुनेचे भांडण होवो किंवा नवरा बायकोचे अडकतो तो नेहमी पुरुषच. पुरुषांची बाजू ऐकायला आणि समजून घ्यायला कोणीही तयार नसतं. किंबहुना त्यांचीही बाजू आहे याचा साधा विचारही कोणी करत नाही.

सासू सुनेच्या वादात तर पुरुषांचे अक्षरशः सँडविच होते. हे वाद किरकोळ असतात तेव्हा पुरूष दुर्लक्षाय नमः चा जप करतात. पण जेव्हा हेच वाद चव्हाट्यावर येतात तेव्हा मात्र निर्दोष असलेल्या पुरुषांनाही शिक्षा भोगावी लागते.

घर संसार आहे म्हंटल्यावर भांड्याला भांड लागणारच. पण सतत भांडी एकमेकांवर आदळून भांडी फुटायची वेळ येते तेव्हा त्या आवाजाने शेजाऱ्यांनाही त्रास होतो. भांडण कोणतेही असो आरोपी तर पुरुषांनाच ठरवलं जाते. अशावेळी दाद मागायची कुठं या गोंधळात असलेल्या पुरुषांसाठी एक संस्था सुरू करण्यात आली आहे. पत्नी पीडित पुरुष आश्रम असे या संस्थेचे नाव असून ती औरंगाबाद येथे आहे.

औरंगाबाद येथील रहिवासी भारत फुलारे यांनी या आश्रमाची सुरवात केली. भारत हे स्वतः पत्नी पिडित आहेत. भारत यांचा २००४ मध्ये विवाह झाला होता. सुरूवातीला छान असलेले सगळे काही नंतर मात्र विस्कळीत झाले. पत्नीसोबतचा वाद विकोपाला गेला आणि त्यांना कलम 498, 307 खाली त्यांना अटक करण्यात आली.

या वादातून त्यांना जेलची हवा खावी लागली. ज्यावेळी त्यांचा पत्नीसोबतचा वाद कोर्टात होता त्यावेळी त्यांना मदत करणारे कोणी नव्हते. ते एकटे पडले होते. जवळपास दीड वर्ष ते मंदिरात राहिले. त्यांना अटक करण्याचा आदेश कोर्टाने दिला तेव्हा ते पळून गेले. उत्तराखंडमध्ये काही दिवस मिळेल ते काम करून उदरनिर्वाह केला. तिथे मृतदेह जाळण्याचेही काम त्यांनी केले.

ते परत आले तेव्हा कोर्ट कचेऱ्याच्या कचाट्यात अडकले. २०१३ मध्ये त्यांनी पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतला नाही. कारण त्यांच्याकडे पोटगी द्यायलाही पैसे नव्हते.

मी इतराचे लग्न मोडावे या हेतूने हे काम करत नाही. मात्र कौटुंबिक वादाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांना होणारा मानसिक त्रास याचा किमान कुठं तरी विचार व्हावा यासाठी मी झटत आहे. माझ्या संस्थेत येणाऱ्या प्रत्येक पुरूषासाठी मी काम करत आहे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत असल्याचे मत संस्थापक भारत फुलारे यांचे आहे.

काही काळात त्यांना तुषार वखरे व इतर तीन समदुःखी लोक येऊन फुलारे यांना भेटले व त्यांनी एकमेकांना मदत केली. तसंच १९ नोव्हेंबर २०१६ रोजी म्हणजेच “पुरुष अधिकार” दिवशी त्यांनी हे आश्रम स्थापन केले. या आश्रमात सध्या सात जण राहतात. तर अनेक लोकांना सल्ला देण्याचेही काम ही संस्था करते.

औरंगाबादमध्ये शिरडी – मुंबई हायवेवर हा आश्रम असून आहे. आश्रम आपल्या राज्यात असला तरी याची महती छत्तीसगढ, गुजरात, कर्नाटक येथे पोहीचली आहे. येथून कायदेशीर सल्ला घेण्यासाठी येतात. काही वर्षांपासून या आश्रमाच्या माध्यामांतून कौटुंबिक वादातून त्रास होत असलेल्या पुरुषांना मदत ही संस्था मदत करत आहेत.

गेल्या चार वर्षांच्या काळात आतापर्यंत जवळपास १० हजार पेक्षा जास्त सदस्यांनी याठिकाणी तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी जवळपास अर्ध्याहून अधिक इतर राज्यांतील आहेत. इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पिडितांना समुपदेशन केले जाते.

या आश्रमात प्रवेश घेणे सोपे नाही

या संस्थेबद्दल माहिती मिळताच अनेक पुरूष त्यांच्याशी संपर्क करतात. पण, हा आश्रम अशा लोकांची काहीच मदत करू शकत नाही जे लोक कमी पत्नी पिडीत आहेत. म्हणजे या संस्थेच्या नियमानूसार तूम्ही पत्नीपिडीत असाल आणि जर तूमच्यावर कोर्टाच्या २० किंवा त्याहून अधिक केस सुरू असतील तरच ही संस्था तूमची मदत करू शकते.

त्याशिवाय तुम्ही पोटगी भरण्यास असमर्थ असायला हवे, तुमची नोकरी गेलेली असावी किंवा घरावर पत्नीनं ताबा केलेला असावा, पत्नीच्या छळामुळं दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असावा यासह इतरही काही नियम आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT