International Tiger Day esakal
देश

International Tiger Day : तुम्हाला वाघ पाळायचा असेल तर काय करावं लागेल?

भारतात वाघांची संख्या किती आहे?

Pooja Karande-Kadam

International Tiger Day : वाघांची संख्या वाढावण्याच्या हेतूने जनजागृती करण्यासाठी आज International Tiger Day साजरा केला जातो. जगभरात वाघांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी भारतात जेमतेम ३००० च्या आसपास वाघ आहेत. त्यामुळे वाघांची संख्या भारतात वाढावी अन् त्यासाठी आपणही काहीतरी करणे गरजेचे आहे. हे लक्षात रहावं या उद्देशानेच जागतिक वाघ दिवसाचे आयोजन केले गेले आहे.

दरवर्षी जेव्हा वाघ दिनाचे फोटो अथवा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होतात. तेव्हा आपल्यालाही वाघ पाळता येईल का? असा प्रश्न उत्साहाने विचारणारे काही लोक आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. (International Tiger Day)

सोशल मिडियावर रिल्स पाहत असताना तुम्ही शेख लोकांना वाघाच्या गळ्यात बांधलेली दोरी पकडून वावरताना पाहिलं असेल. त्यावरून आपणही असा रूबाब करावा असा विचार तुमच्या मनात आला असेल तर थांबा. हा नियम आपल्या देशात नाहीय. (International Tiger Day :  international tiger day you need to do this if you want to keep tiger as pet at your home)

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल किंवा त्याच्या बातम्याही पाहिल्या असतील की, ऊसतोड करताना वाघाचे, बिबट्याचे बछडे सापडले. किंवा एखाद्या ठिकाणी जंगल सफारी करताना वाघाचे बछडे सापडले तर ते तुम्हाला पाळता येतात का?.

रस्त्यावर सापडलेलं एखादं कुत्र्याचं पिल्लू आपल्याला सापडलं तर ते आपण घरात घेऊन येतो. तसं वाघाच्या बछड्यांना सांभाळता येत का, यासाठी काय नियमावली आहे असे प्रश्नही तुमच्या मनात उपस्थित राहीले असतील. (Tiger Conservation)

भारतात काय आहे प्राण्यांच्याबाबतीतला नियम

पहिल्यांदा आपण भारताबाबत जाणून घेऊया. भारतामध्ये कोणत्याही धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांना पाळता येत नाही. या धोकादायक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये सिंह, वाघ किंवा चित्ता यांचाही समावेश आहे.

वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्ट (वन्यजीव संरक्षण कायदा) अंतर्गत या प्राण्यांना खासगी पद्धतीने पाळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. जर कोणालाही त्यांचा वापर इतर कामांसाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर मंजुरी घ्यावी लागेल.

एखाद्या व्यक्तीला धोकादायक प्रजातींचे प्राणी पाळायचे असतील, तर त्यासाठी राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डनकडून मान्यता घ्यावी लागेल. तुम्हाला त्या प्राण्याची प्रत्येक गरज भागवावी लागेल. याशिवाय संपूर्ण सुरक्षेची व्यवस्थाही करावी लागेल.

तुम्हाला वाघ पाळायचा असेल तर हे करावं लागेल

भारतात जरी वाघ पाळायला परवानगी नसली तरीही तुम्हाला वाघ पाळायची इच्छा पूर्ण करायची असेल तर परदेशात स्थायिक व्हावे लागेल. तसं बघायला गेलं तर आता अनेक देशांनी धोकादायक प्राणी पाळण्यावर बंदी घातली आहे. हे केवळ थायलंड आणि आफ्रिकेतील काही देशांमध्येच शक्य आहे.

खरंतर 2015 साली मध्य प्रदेश सरकारमधील तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहदेल यांनी वाघांची संख्या वाढवणे कायदेशीर असावे, अशी मागणी केली, तेव्हा त्यांनी थायलंड आणि आफ्रिकेचे उदाहरणही दिले होते.

भारतात वाघांची संख्या किती आहे?

जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्के वाघ हे भारतात आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये वाघांची संख्या 20 हजार ते 40 हजार इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात शिकार व अन्य कारणांमुळे वाघांची संख्या सातत्याने घटत गेली.

सध्याच्या घडीला भारतामध्ये केवळ 2,967 वाघ शिल्लक आहेत. त्यामुळे वाघाची प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये व्याघ्र संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. देशातील 18 राज्यांमधील 47 व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT