satya sai baba and Madhusudhan Naidu सकाळ
देश

MBA झालेला सद्गुरु घेतोय सत्य साईबाबांची जागा

सत्य साई बाबा यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आंध्र प्रदेशातील तीर्थक्षेत्र पुट्टापर्थी येथे सध्या नव्या सद्गुरूंच्या आगमनाने भक्तांमध्ये फूट पडली आहे

सकाळ डिजिटल टीम

भारतात साधू किंवा बाबांवरील लोकांचा विश्वास कायम दिसतो. अनेक बाबा दैवी चमत्कार दाखवून प्रसिद्धीच्या झोतात आले त्यातलचं एक नाव म्हणजे सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबांनी अनेक चमत्कार दाखवून भक्तांना आश्चर्यचकित केले आहे.

स्वतःला शिर्डीच्या साईबाबांचा अवतार म्हणवून घेणारे सत्य साईबाबांचा समाजातील मोठमोठ्या लोकांवर प्रभाव होता. राजकारणापासून क्रीडा आणि चित्रपट दुनियातील लोक सत्यसाई बाबाचे चाहते होते. आता याच सत्य साईबाबांची जागा घ्यायला नवीन सद्गुरूंचं आगमन झालंय, अशी चर्चा आहे. (Is Madhusudan Naidu a Representative of Sri Satya Sai Baba?)

सत्य साई बाबा यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आंध्र प्रदेशातील तीर्थक्षेत्र पुट्टापर्थी येथे सध्या नव्या सद्गुरूंच्या आगमनाने भक्तांमध्ये फूट पडली आहे. सत्यसाई बाबा यांचा 2011 मध्ये मृत्यूनंतर एका नवीन धर्मगुरूचा उदय झाल्याने 114 देशांमध्ये केंद्रे असलेल्या सत्य साई बाबाच्या आश्रमाचा वारसा धोक्यात आलाय.

मधुसूदन नायडू नावाची व्यक्ती नवीन सद्गुरूं असून ते साईबाबांच्या खूप जवळ होते, पण तुम्हाला माहिती आहे का? हे मधुसूदन नायडू कोण?

मधुसूदन नायडू कोण?

साईबाबांच्या खूप जवळ जाणारे मधुसूदन नायडू यांचा जीवनप्रवास फार रोमांचक आहे. 1996 मध्ये केमिस्ट्रीमधून नायडू पदवीधर झाले. त्यानंतर ते वृंदावन कॅम्पसमध्ये सहभागी झाले, ज्यासाठी त्यांना सत्य साई बाबा यांच्याकडून सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर त्यांनी प्रशांती निलयम कॅम्पसमध्ये केमिस्ट्रीमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी संस्थेत एमबीएसाठी प्रवेश घेतला आणि प्रथम येत पुन्हा स्वामी सत्य साई बाबा यांच्याकडून सुवर्णपदक जिंकले. लहानपणापासूनच सत्य साई बाबांनी त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकला.

श्री मधुसूदन यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनात कला आणि संगीतात प्रावीण्य मिळवले. त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या दीक्षांत नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. एक उत्तम वक्ता आणि प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती.

स्वामींच्या आशीर्वादाने कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका खाजगी बँकेत त्यांना नोकरी मिळाली. मात्र काही काळातच त्यांच मन कामातून उडले. ते नोकरी सोडण्याचा विचार करत होते अखेर त्यांनी स्वामींची परवानगी घेत नोकरी सोडली आणि स्वामींच्या सेवेत लागले.

सत्य साईबाबा यांच्या मृत्युनंतर साईबाबा त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना त्यांना कामे करण्यासाठी सूचना देतात, असा दावा नायडू यांनी स्वत: केला होता मात्र या दाव्यावर सत्य साईबाबा ट्रस्टवाल्यांचा विश्वास नाही. साईबाबांचा अवतार असल्याचा नायडू यांचा दावा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय त्यांचा सत्य साई बाबा यांच्याशी काहीही संबंध नाही, असेही ट्रस्टचे म्हणणे आहे.

नायडू यांच्या या आगमनाने सध्या सत्य साई बाबाचे भक्तांममध्ये नाराजीचे वातावरण असून स्वत:ला सत्य साईबाबांचा अवतार समजणारे मधुसूदन नायडू यांना स्वीकारायला लोक मात्र पाठ फिरवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT