Gaganyaan Mission Sakal
देश

Gaganyaan: 'गगनयान'साठी मोठं पाऊल! इतर देशांनी तंत्रज्ञान नाकारलं, इस्रोनं स्वतः केलं तयार

मानवाला अंतराळात पाठवणाऱ्या गगनयान या भारताच्या महत्वाकांक्षी मोहिमेची तयारी जोरात सुरु झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : मानवाला अंतराळात पाठवणाऱ्या गगनयान या भारताच्या महत्वाकांक्षी मोहिमेची तयारी जोरात सुरु झाली आहे. या मोहिमेसाठी भारताला एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाइफ सपोर्ट सिस्टिमची (ईसीएलएसएस) गरज होती, इस्त्रोनं इतर देशांकडं हे तंत्रज्ञान मागितलं पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता इस्रोनं स्वतःच हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. (ISRO to make its own Life Support System for Gaganyaan after other countries refuse to share tech)

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी बुधवारी पाचव्या मनोहर पर्रिरकर विज्ञान महोत्सवात बोलताना सांगितलं की, आपल्याजवळ एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाइफ सपोर्ट सिस्टिम (ईसीएलएसएस) विकसित करण्याचा कुठलाही अनुभव नाही. आपण केवळ रॉकेट आणि सॅटेलाईटच बनवतो. आम्ही असा विचार केला होता की, याल बनवण्यासाठीचं तंत्रज्ञान आपण इतर देशांकडून घेऊयात. पण कोणताही देश आपल्याला हे तंत्रज्ञान द्यायला तयार नाही.

त्यामुळं आता एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि लाइफ सपोर्ट सिस्टिम (ईसीएलएसएस) आपल्याच देशात विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी आम्ही भारतात उपबल्ध ज्ञान आणि उद्योगांचा वापर करणार आहोत. गगनयान कार्यक्रमासमोरील आव्हानं बोलताना सोमनाथ म्हणाले, भारत गेल्या अनेक वर्षांपासून नॉलेज बिल्डिंग डिझाईन क्षमता विकसित करण्यात व्यस्त आहे. मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमत यातलं शिखर असणार आहे. (Latest Marathi News)

गगनयान मिशन महत्वाचं

जेव्हा आपण गगनयान मोहिमेद्वारे मानवाला अंतराळात पाठवणार आहोत. तेव्हा मला वाटतं आपल्याकडं जे कौशल्य आणि आत्मविश्वास असायला हवा तो सध्याच्या कौशल आणि आत्मविश्वासपूर्ण असायला हवा. गगनयान मोहिमेचा पहिला हिस्सा रॉकेट आहे.

सोमनाथ म्हणाले, रॉकेट कायम फेल होण्याचा धोका असतो. जेव्हा आमही रॉकेट लॉन्च करतो तेव्हा आमचा तणाव आणि धडधड वाढते. भलेही रॉकेट अधिक सुरक्षितरित्या बनवलेलं असलं तरी सर्व प्रक्रियांचा समावेश केलेला असला तरी काहीही चुकीचं होऊ शकतं. तसेच जर काही चुकीचं घडलं तर हे कोणीही सुधारु शकत नाही. रॉकेट यशस्वी होण्यासाठी हजारो गोष्टी योग्य प्रकारे काम करावं लागतं. (Marathi Tajya Batmya)

भारताची महत्वाकांक्षी मोहिम

इस्रोचं महत्वाकांक्षी गगनयान मोहिम सन २०२५ मध्ये लॉन्च होणार आहे. तीन दिवसाच्या या मोहिमेत मानवाला ४०० किमी उंचीवर पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत सोडून तिथून त्यांना सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरवणं हे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT