Nirbhaya Case Delhi sakal
देश

Nirbhaya Case Delhi: 'निर्भया प्रकरणाला ११ वर्षे पूर्ण; मात्र खरंच देशात बदल झाला आहे का?

सकाळ डिजिटल टीम

देशाला हादरून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार घटनेला ११ वर्ष पूर्ण झालेले असताना गेल्या दशकात देशातल्या, राजधानीतील स्थितीत स्वाती मालिवाल काहीच बदल झालेला नाही, अशी खंत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी व्यक्त केली.

दिल्लीत महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचेही त्या म्हणाल्या. एका २३ वर्षीय युवतीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीतील एका बसमध्ये सहा आरोपींनी बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर तिला बसमधून फेकून देण्यात आले.

तिच्यावर उपचार सुरू असताना २९ डिसेंबर रोजी सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात मृत्यू झाला. देशात संतापाची लाट उसळली आणि यानंतर लैंगिक शोषण आणि अत्याचारासंबंधी नवीन कायदे तयार करण्यात आले. या घटनेतील पीडितेला 'निर्भया' असे नाव देण्यात आले. यासंदर्भात स्वाती मालीवाल म्हणाल्या,

निर्भयावर २०१२ मध्ये सामूहिक बलात्कार झाला. या घटनेनंतर लोक रस्त्यावर उतरले आणि बदलाची मागणी करू लागले. मात्र आजही अनेक वर्षांनंतर आपण आहे तेथेच आहोत. महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जोपर्यंत गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होणार नाही आणि आपल्याला व्यवस्था मोकाट सोडणार नाही, असे जोपर्यंत आरोपींच्या मनाला वाटणार नाही, तोपर्यंत काही बदलणार नाही.

अशा प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा सुनावणे आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन मालीवाल यांनी केले. अशा घटनांना चाप बसविण्यासाठी पोलिसांचे अधिकार आणि न्यायालयाची संख्या वाढवायला हवी. पीडितांना आणि कुटुंबीयांना वेगाने न्याय देणारी व्यवस्था तयार करायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

या घटनेने मुलांच्या मनात महिलांविषयी आदर निर्माण करणाऱ्या विषयांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला हवा. कौटुंबीक हिंसाचार म्हणजे काय ? त्याला कसे रोखता येईल? याचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे. या गोष्टी शाळेतच शिकवल्या पाहिजेत. शाळेत शिकले नाही तर एखाद्या पुरुषाने महिलेवर हात उगारणे किती चुकीचे आहे, हे कोण सांगणार? - स्वाति मालीवाल, अध्यक्षा, दिल्ली महिला आयोग

निर्भया प्रकरण

निर्भयाप्रकरणी सहा आरोपींपैकी राम सिंह याने खटला सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोठडीत आत्महत्या केली. एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविले आणि तीन वर्षांनी २०१५ रोजी त्याची सुटका झाली. अन्य चार आरोपी मुकेश सिंह (वय ३२), पवन गुप्ता (वय २५), विनय शर्मा (वय २६), अक्षयकुमार सिंह (वय ३१) यांना दोषी ठरविण्यात आले. त्यांना २० मार्च २०२० मध्ये तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT