किती दूर आहे Omicron भारतापासून? 'या' देशांमध्ये आढळून आले रुग्ण esakal
देश

किती दूर आहे Omicron भारतापासून? 'या' देशांमध्ये आढळून आले रुग्ण

किती दूर आहे Omicron भारतापासून? 'या' देशांमध्ये आढळून आले रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना (Covid) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटने जगभरातील सर्व देशांची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओने असे नोंदवले आहे, की कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंट किमान 23 देशांमध्ये पसरला आहे. डब्ल्यूएचओने भीती व्यक्त केली, की ओमिक्रॉन व्हेरिएंट अजूनही अनेक देशांमध्ये पसरू शकतो. बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटचे वर्णन डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक प्राणघातक म्हणून केले आहे.

बोत्स्वाना, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, हॉंगकॉंग, इस्रायल, यूके, नेदरलॅंड्‌स, ब्राझील, कॅनडा, सौदी अरेबिया, स्वीडन, स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, इटली आणि यूएसए यांसारख्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट दाखल झाला आहे. भारत आतापर्यंत या व्हेरिएंटपासून दूर आहे.

Omicron व्हेरिएंटची एकही केस आतापर्यंत भारतात दिसलेली नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतीच ही माहिती दिली. नवीन व्हेरिएंट भारतात येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटची अनेक संशयित प्रकरणे आढळून आली आहेत. 1 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर लंडन आणि ऍमस्टरडॅममधील चारजण कोविड पॉझिटिव्ह आढळले. या सर्व रुग्णांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने ओमिक्रॉन व्हेरिएंट लक्षात घेऊन एक सल्ला दिला आहे. यासोबतच बंदरे आणि विमानतळांवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. संशयित कोरोना प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी लोकांना कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT