बंगळुरु: "मुख्यमंत्री म्हणून कर्नाटकाची (karnataka cm) सेवा करण्याची मला दोन वर्ष संधी दिली, त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (amit shah) आणि भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा (jp nadda) यांचा आभारी आहे." येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंजूर केला आहे. बीएस येडियुरप्पा हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहणार आहेत. (Ive not given name of anyone who should succeed me Karnataka CM BS Yediyurappa dmp82)
"कर्नाटक आणि माझ्या मतदारसंघातील जनतेचा मी आभारी आहे. मी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे" असे येडियुरप्पा म्हणाले. "राजीनामा देण्यासाठी कोणी माझ्यावर दबाव टाकला नाही. मी स्वत:हून राजीनामा दिला, जेणेकरुन दुसऱ्यांला मुख्यमंत्री बनता येईल. पुढच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मी काम करणार आहे" असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
माझ्यानंतर कोणाला मुख्यमंत्री बनवावे? या संदर्भात मी कोणाचेही नाव सुचवलेले नाही, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. भाजपाकडून लवकरच कर्नाटकात निरीक्षक पाठवण्यात येतील. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? या बद्दल चर्चा करुन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.