Jama Masjid To Close Again Till June 30 Over Rising COVID-19 Cases In Delhi 
देश

दिल्लीतील जामा मशिद 'या' तारखेपर्यंत बंदच 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिद ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची माहिती जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी दिली आहे. दिल्लीत सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांशी व इस्लामिक विद्वानांशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही बुखारी यांनी सांगितले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शाही इमाम यांच्या सचिवांचा मंगळवारी रात्री सफदरजंग येथील रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मानवाचं जिवन संकटात आहे अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा लोकांच्या जिवनाचं रक्षण करणं आवश्यक असतं. मानवाचं रक्षण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि शरीयतमध्येही याचा विशेष उल्लेख करण्यात आला असल्याचा दाखला असं बुखारी यांनी देत लोकांना संदेश दिला आहे. काल (ता. ११) गुरूवारी संध्याकाळपासून ते ३० जूनपर्यंत जामा मशिदीत सामूहिक नमाज अदा केली जाणार नाही. काही ठराविकच लोक दररोज पाच वेळा नमाज अदा करतील. तर इतर नमाजी त्यांच्या घरीच नमाज अदा करतील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
--------
कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी
--------
दरम्यान, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी ९,९९६ नव्या रुग्णांची भर पडली असून सलग नवव्या दिवशी नऊ हजारहून अधिक रग्ण वाढले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ८१०२ मृत्यू झाले असून गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वात जास्त म्हणजे ३५७ मृत्यू नोंदवले गेले आहेत. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४९.२१ टक्के झाले असून ते बुधवारी ४८.३७ टक्के होते. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारीही जास्त होती. उपचाराधीन रुग्ण १.३७ लाख व बरे झालेले रुग्ण १.४१ लाख इतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT