jamiat ulema e hind maulana arshad madani statement on religion against rrs chief mohan bhagawat  
देश

Video : ओम अन् अल्लाह एकच…;जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मौलानांचे वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

जमीयत उलेमा-ए-हिंद चे शेवटचे मौलाना अरशद मदनी यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जमीयत उलेमा-ए-हिंद यांच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अरसद मदनी यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर टीका केली.

यावेळी बोलताना त्यांनी अल्लाह आणि ओम एकच असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात अधिवेशनात उपस्थित वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू उठून गेल्याचे देखील पाहायला मिळालं.

मौलाना काय म्हणाले..

मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, मी धर्मगुरूंना विचारले, जेव्हा कोणीही नव्हते, ना श्रीराम, ना ब्रह्मा, ना शिव होते, तेव्हा प्रश्न तयार होतो की मनु कोणाची पूजा करत? काही लोक म्हणतात की शिव ची पूजा करत. पण खूप कमी लोक सांगतात की मनू ओमची पूजा करत असत.

पुढे मौलाना म्हणाले की, मी विचारलं ओम कोण आहे?, तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं की, ओम हवा आहे. ज्याचं कोणतंच रुप, रंग नाही. तर मी म्हटले की आम्ही त्यांनाच आम्ही अल्लाह म्हणतो, तुम्ही देव म्हणता , फारशी बोलणारे खुदा आणि इंग्रजी बोलणारे गॉड म्हणतात. या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

दिल्लीत सुरू असलेले जमीयत उलेमा-ए-हिंदचे अधिवेशन सातत्याने वादात सापडत आहे. काही दिवसांपूर्वीही महमूद मदनी यांनी कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. इस्लाम हा जगातील सर्वात जुना धर्म असून इस्लामचा जन्म भारतात झाला, असा मोठा दावा त्यांनी केला. त्यांना (हिंदूंना) वाटले की मशिदी पाडून इस्लाम संपेल, पण तसे नाही. जर हृदय स्वीकारत नसेल तर इस्लाम त्याचा असू शकत नाही. आम्ही हिंदूंसोबत भावाप्रमाणे राहतो. असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT