jammu and kashmir road accident esakal
देश

Accident : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी

या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचं बचावकार्य सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचं बचावकार्य सुरू आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये (Jammu and Kashmir Poonch) आज (बुधवार) सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस (Bus) दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ (Tehsildar Shehzad Latif) यांनी दिलीय.

शहजाद लतीफ यांनी सांगितलं की, या अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्कराचं बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून जखमींना मंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालीय.

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पुंछ दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. जखमींना चांगले उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT