Jammu Kashmir Team eSakal
देश

गोळीबाराने भिंतीची चाळण आणि गवतात काडतुसं... दोघांना कंठस्नान

सुरक्षा दलांनी शुक्रवारी केलेल्या या कारवाई दरम्यान मोठी चकमक झाली.

सुधीर काकडे

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगर शहर सुरक्षा दलांनी (Indian Army) शुक्रवारी मोठी कारवाई केली. श्रीनगरच्या (Shrinagar) झाकुरा परिसरात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीत पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना (Two Terrorist Neutralized) कंठस्नान घातलं. काश्मीर झोन पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. श्रीनगर पोलीस आणि सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा (LET) आणि हिजबुल मुजाहीद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार केल्याचं समजतंय. पोलिसांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या ताब्यातून 2 पिस्तुलांसह आणखी काही गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी सकाळी झालेल्या या चकमकीत इकलाख हजम हा दहशतवादीही मारला गेला. अनंतनागच्या हसनपोरा येथील एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येत हजमचाही हात होता. याआधी बुधवारीही सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं होतं. शुक्रवारी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर इश्फाक मलिक उर्फ ​​मुसा असं या दहशतवाद्याचे नाव आहे.

शोपियानच्या नदीगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई सुरू केली होती. कारवाईसाठी यंत्रणा घटनास्थळी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT