Article 370. Esakal
देश

Jammu Kashmir: कलम 370 लागू होण्या आधीची आणि लागू झाल्यानंतरची परिस्थिती..

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेले 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आज तिन वर्ष पूर्ण होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा असलेले 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आज तिन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्राच्या या निर्णयाला बऱ्याच राजकीय पक्षांनी पाठिंबाही दिला होता. मात्र, काही पक्षांनी यालि विरोधही दर्शवला होता.

कलम 370 हटवण्याचे मुख्य कारण काय होते ?

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना मोडून तेथील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणे, हाच कलम 370 हटवण्याचे कारण सांगण्यात आले होते.अखेर कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश एक नोव्हेंबरपासून अस्तित्वात आले.

आज आपण ऐतिहासिक कलम 370 विषयी आणि कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या बदलांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

जम्मू काश्मीरला कलम 370 नुसार सार्वभौम राज्य म्हणून विशेष दर्जा देण्यात आला होता. 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली. तेव्हा जम्मू काश्मीरचे राजा हरीसिंह यांना स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. जम्मू आणि काश्मीर हे भारत किंवा पाकिस्तान यांच्यात विलीन न होता, स्वतंत्र राज्य राहावे, ही त्यांची इच्छा होती. मात्र, त्यानंतर त्यांनी भारतात विलीनीकरणासाठी मंजुरी दिली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेत शेख अब्दुल्ला यांनी पहिले हंगामी सरकार स्थापन केले. जम्मू काश्मीरला भारतीय संविधानाच्या कक्षेच्या बाहेर ठेवत विशेष दर्जा देण्याची मागणी त्यांनीच केली होती. हा दर्जा जम्मू काश्मीरला सुरवातील तात्पुरत्या स्वरूपाचा दिला होता. मात्र अजूनही हा दर्जा कायमच होता. हा दर्जा काढून घेण्याची मागणी वारंवार झाली होती. अखेर ती मागणी अमित शाह यांनी 2019 मध्ये कलम 370 रद्द करत पूर्ण केली.

जम्मू काश्मीर मध्ये काय परिस्थिती होती कलम 370 रद्द आधी?

काश्मीरचे रहिवासी नसणारे लोक पण फाळणीनंतर निर्वासित म्हणून काश्मिरात आलेले हजारो हिंदू तसेच मुस्लिम काश्मीरी लोक हे काश्मीरचे अधिकृत रहिवासी नव्हते. त्यामुळे त्यांना मतदार किंवा नोकरीसाठी अपात्र ठरवले जातं होते. तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला कोणताही निर्णय जम्मू-काश्मीरसाठी लागू होत नव्हता. जम्मू काश्मीरमध्ये माहिती अधिकार कायदा लागू होत नव्हता. तसेच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची मुदत ही 6 वर्षांची होती. भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये ही जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. जम्मू-काश्मीरमधील महिलेने इतर राज्यांतील किंवा विदेशातील व्यक्तीशी लग्न केले तर तिचे काश्मीर राज्याचे नागरिकत्व संपुष्टात येत असे. जम्मू काश्मीरचा रहिवासी नसलेल्या व्यक्तीला तेथे जमीन खरेदी करता येत नव्हती.जम्मू-काश्मीरचा एक स्वतंत्र ध्वज होता. तिथे आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा फडकवला जात नव्हता. तसेच हिंदू, शीख या अल्पसंख्याकांना जम्मू-काश्मीर मध्ये आरक्षण नव्हते.जम्मू-काश्मीरच्या नागरिकांकडे भारत आणि काश्मीरचं असं दुहेरी नागरिकत्व असायचं.

जम्मू काश्मीर कलम 370 लागू झाल्यानंतर काय बदल झाले?

भारतातील इतर नागरिकांप्रमाणे जम्मू-काश्मीरच्या नागरिकांकडे सुध्दा आता फक्त भारताचे ऐकरी नागरिकत्व आले आहे. जम्मू काश्मीरचा रहिवासी नसलेले म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या लोकांना तेथील जमीन खरेदी करण्याची परवानगी नव्हती. मात्र, आता तुमची ईच्छा असेल तर तुम्हाला जम्मू काश्मीर मध्ये जमीन खरेदी करता येईल.2019 मध्ये, कलम 370 रद्द केल्याच्या 20 दिवसांनी, श्रीनगर सचिवालयातून जम्मू काश्मीरचा ध्वज काढून तिथे भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवण्यात आला. सर्व सरकारी कार्यालये आणि घटनात्मक संस्थांवरही राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जम्मू-काश्मीर आणि लड्डाखमध्येही भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्णय लागू होऊ लागले.विधानसभेची मुदत ही 6 वर्षावरुन 5 वर्षांची झाली. एखाद्या व्यक्तीने जर जम्मू काश्मीरमधील मुलीशी लग्न केले. तर तो व्यक्ती आणि त्यांची मुले जम्मू काश्मीरची कायम रहिवासी मानले जात नव्हते. मात्र, आता नियम बदल्यानंतर ते कायमचे रहिवासी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT