A damaged school bus seen overturned at the accident site in Jammu, where students were injured while returning home from a school trip.
esakal
Students Injured as School Picnic Bus Overturns in Jammu : जम्मूच्या बिश्नाह भागातील रिंग रोडवर एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. सहलीवरून परतणारी एक खासगी शाळेची बस दुभाजक ओलांडून उलटली, ज्यामध्ये किमान ३५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जम्मूच्या एम्समध्ये पाठवण्यात आले आहे, तर काहींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसारे, ही बस प्रगवल अखनूर येथील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीवरून परत घेऊन जात होती. दरम्यान, अचानक चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस दुभाजकावरून चढली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटली.
माहिती मिळताच, पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. प्रशासन जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.