Bihar Love Affair Case esakal
देश

Bihar : दोन मुलांच्या आईचं फेसबुकवरुन 15 वर्षाच्या मुलावर जडलं प्रेम

दोन मुलांची 35 वर्षांची आई चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडलीय.

सकाळ डिजिटल टीम

दोन मुलांची 35 वर्षांची आई चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडलीय.

लोक सोशल मीडियाचा (Social Media) अनेक प्रकारे वापर करतात. परंतु, काहीवेळा ते कुटुंब आणि समाजासाठी हानिकारक देखील ठरतं. सोशल मीडियाशी संबंधित असंच एक प्रकरण बिहारच्या जमुई (Bihar Jamui) जिल्ह्यातील एका गावातून समोर आलंय. जमुई जिल्ह्यातील दोन मुलांची 35 वर्षांची आई चक्क 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडलीय. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की, महिलेनं हा मुलगाा आपल्या माहेरचा असल्याचा बहाणा करुन प्रियकर मुलाला घरातच थांबवलं.

त्यानंतर रात्रीच्या अंधारात तिच्या पतीनं महिलेला मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर गदारोळ झाला आणि पतीनं व ग्रामस्थांनी गावातील मंदिरासमोर दोघांनाही बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही घटना जमुई जिल्ह्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हरला गावातील आहे. जमुई इथं राहणार्‍या 35 वर्षीय महिलेची फेसबुकवर दहावीच्या वर्षात शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाशी ओळख झाली. हा मुलगा जेहानाबादमध्ये राहत असल्याचं समोर आलंय.

प्रियकर प्रेयसीच्या घरी पोहोचला

दोघं मेसेंजरवर तासनतास व्हिडिओ चॅट करत असतं. दरम्यान, रविवारी महिलेनं या मुलाला आपल्या घरी बोलावून माहेरचा रहिवासी असल्याचं सांगून आपल्या घरात राहायला लावलं. दरम्यान, रात्री उशिरा ही महिला त्या मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. याचदरम्यान महिलेच्या पतीनं दोघांना पाहिलं. यानंतर या दोघांना गावातील मंदिराजवळ सर्वांसमोर मारहाण केली. स्थानिक लोकांच्या बचावामुळं हे प्रकरण मिटलंय. मात्र, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

फेसबुकवरुन जुळलं प्रेम

जमुई इथं राहणारी 35 वर्षांची दोन मुलांची आई फेसबुक मेसेंजरवर (Facebook) चॅट करत असताना जेहानाबादच्या 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मेसेंजरवर तासनतास व्हिडिओ चॅट करत असते. दोघांमधील संभाषण पुढं गेल्यावर हे प्रकरण प्रेमप्रकरणापर्यंत पोहोचलं. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घ्यायला सुरुवात केली होती.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मारहाण करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी महिला प्रेयसीनं मुलाला (प्रियकर) आपल्या मिठीत धरलं असून तिचा नवरा त्या दोघांना लाठ्या-ठोक्यांनी मारहाण करत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, मुख्याधिकारी व घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झालं व मुलाच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT