देश

जावेद अख्तर, शबाना आझमींनी का घेतली 'ममतां'ची भेट?

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या पाच दिवसातील त्यांचं वेळापत्रक अत्यंत व्यस्त असलेलं दिसून येतंय. त्यांनी गेल्या तीन दिवसांत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. कालच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तर आज गुरुवारी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दरम्यानच आज गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी देखील ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांतील विजयानंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आल्या आहेत. आज सायंकाळी पाच वाजता जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याशीही त्यांची बातचित झाली.

या भेटीनंतर जावेद अख्तर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, त्यांनी म्हटलंय की, ही भेट शिष्टाईसाठीची होती. बंगालचा हा इतिहासच राहिलाय की बंगालने नेहमीच अनेक क्रांतीकारी गोष्टींचं नेतृत्व केलंय. बंगालमधील कलाकार आणि विचारवंत लोक ममता बॅनर्जींनाच पाठिंबा देतात. आम्ही त्यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. रॉयल्टी विधेयकातील दुरुस्तीसंदर्भात ममताजी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेत जेणेकरून संगीतकार, गीतकार, गीतकारांना रॉयल्टीचा लाभ मिळू शकेल.

मला असं वाटतं की देशात परिवर्तनाची गरज आहे. सध्या देशात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुरु आहेत. ध्रुवीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनेकजण प्रक्षोभक वक्तव्ये करत आहेत. अनेक ठिकाणी हिंसेंच्या घटना घडत आहेत. दिल्लीत हिंसाचाराची घटना घडली ही लज्जास्पद बाब आहे.

ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व करावं का? या प्रश्नावर जावेद अख्तर म्हणाले की, आमचं फार कमी बोलणं झालं त्यामध्ये त्यांनी नेतृत्वाबद्दल काही बोलणं केलं नाही. मात्र, त्यांनाही परिवर्तन हवंय असं त्या म्हणाल्या. अलिकडेच त्या बंगालसाठी लढल्या आहेत आणि आता त्या देशासाठी लढतील. कोण नेतृत्व करेल हा मुद्दा महत्त्वाचा नाहीये मात्र, भारत कसा असायला हवा, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकशाही ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

देश नेहमी बदलण्याच्या स्थितीत असतो, देशात परिवर्तनाची गरज आहे. दिल्लीमध्ये दंगली झाल्या आहेत. ही दुर्दैवाची बाब आहे की देशात भीतीचं वातावरण आहे. देशातील हे भीतीचं वातावरण नष्ट व्हायला हवं. मात्र, त्या या प्रश्नाला टाळातात की देशातील विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करेल? बंगाल मॉडेल हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. यामध्ये काहीच शंका नाहीये की, देशात 'खेला होबे' होईल.

ममता बॅनर्जी पंतप्रधान बनतील की नाही यापेक्षा हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे की, हा देश कशापद्धतीने चालवला गेला पाहिजे. कशाप्रकारची लोकशाही इथे असावी, आता देखील चांगली आहे, मात्र, अजून चांगली असायला हवी. या भेटीला विरोधकांच्या एकजुटीसाठीची भेट म्हणून पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT