Celebrity hairstylist Javed Habib faces multiple FIRs and a lookout notice in connection with an alleged multi-crore cryptocurrency scam.

 

esakal

देश

Jawed Habib FIR News : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब विरुद्ध तब्बल ३२ 'FIR' दाखल!

Jawed Habib Crypto Scam : कोट्यवधींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा आरोप अन् लूकआउट नोटीसही करण्यात आली जारी!

Mayur Ratnaparkhe

Lookout Notice Issued Against Jawed Habib : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचे नाव आता एका मोठ्या क्रिप्टो फ्रॉड केसशी जुडले गेले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील पोलिस पथकाने दिल्लीतील त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो उपस्थित नव्हता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हबीब सध्या चौकशीला टाळाटाळ करत आहे आणि सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याला लवकरच हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हबीबवर अंदाजे ५ ते ७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आरोप आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध तब्बल ३२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्याचा मुलगा अनस आणि एक भागीदार सैफुल यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या व्यक्तींनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले, परंतु गुंतवणूकदारांना निर्धारित वेळेनंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. 

नेमकं काय आहे फसवणुकीचं प्रकरण? -

पोलिसांच्या माहितीनुसार, हबीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी Follicle Global Company (FLC) नावाच्या एका बनावट योजनेच्या माध्यमातून लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांकडून पाच ते सात लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली गेली आणि दावा केला गेला की त्यांना  Bitcoin आणि Binance Coinमध्ये ५० टक्के आणि ७० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल.

२०२३मध्ये संभलच्या रॉयल पॅलेस वेंकैट हॉलमध्ये एक कार्यक्रमही झाला होता. ज्यामध्ये या योजनेचा प्रचार करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार जवळपास १५० लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली, परंतु अडीच वर्षे उलटूनही त्यांना परतावा मिळाला नाहीच.

संभल पोलिसांनी सांगितले की, एकूण पाच ते सात कोटी रुपयांची फसवूक झाली आहे. यामुळे जावेद हबीब त्याचा मुलगा आणि कुटुंबाविरोधात लुकआट नोटीस जारी केलं गेलं आहे, जेणेकरून ते देश सोडून पळून जाऊ शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi च्या अर्जेंटिना संघाचा भारतीय चाहत्यांना धक्का, केरळ दौऱ्यावर येणारच नाही?

Madhya Pradesh Tourism : इतिहासाचा साक्षीदार आहे हा किल्ला; राणी लक्ष्मीबाईंपासून राजा भोज यांच्याही आहेत पाऊलखुणा

Euthanasia: लॅटिन अमेरिकेतील 'या' देशाने दिली इच्छामरणाला कायदेशीर मान्यता! जाणून घ्या ‘युथनेशिया’ म्हणजे नेमकं काय अन् या कायद्याचे महत्त्व

Mumbai Rain: मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी, हवामान विभागानं काय सांगितलं? जाणून घ्या...

Bihar Election: ५ मुख्यमंत्री, ४ सिनेस्टार अन्...; बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील किती नेते?

SCROLL FOR NEXT