JEE MAIN Exam
JEE MAIN Exam Sakal Digital
देश

JEE Main 2022 परीक्षा दोन टप्प्यात; तारखा जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल टेस्टींग एजन्सीने आज जेईई मेन्स २०२२ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

JEE Main Exam Date 2022 नॅशनल टेस्टींग एजन्सीने मंगळवारी जेईई मेन्स २०२२ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून या तारखा जाहीर केल्या असून दोन टप्प्यात ही परीक्षा आयोजित होणार आहे. एनटीए जेईई मेन २०२२ एप्रिल आणि मे महिन्यात होईल. पहिला टप्पा १६ ते २१ एप्रिल या कालावधीत तर दुसरा टप्पा २४ ते २९ मे या कालावधीत पार पडणार आहे.

जेईई परीक्षेच्या तारखेसह अशीही माहिती देण्यात आली आहे की, रजिस्ट्रेशन प्रोसेस १ मार्चपासून सुरु होणार आहे. (Joint Entrance Examination registration date) ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स २०२२ परीक्षेच्या एका किंवा दोन्ही सत्रासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा. एनटीएने (National Testing Agency) दिलेल्या नोटिसीनुसार जेईई मेन्स दोन फक्त दोन वेळा आयोजित केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा २०२२ द्यायची आहे त्यांनी वेळेत जेईई परीक्षेचा अर्ज भरावा.

अर्जाची प्रक्रिया कधी आणि कशी? (JEE Main how to apply)

> जेईई मेन २०२२ च्या परीक्षेबाबत सविस्तर माहिती जेईईचे संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षा याबाबतची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

> जेईई मेन २०२२ साठी रजिस्ट्रेशनची सुरुवात १ मार्च २०२२ पासून होणार आहे. तसंच ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

> जेईई मेन्स दोन टप्प्यात होणार असून यात एप्रिलमध्ये १६ ते २१ तारखेदरम्यान परीक्षा होईल. त्यानंतर मे महिन्यात २४ ते २९ या कालावधीत परीक्षा पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

Rinku Rajguru: तुम्हाला लेकीसाठी कसा मुलगा हवा? रिंकू राजगुरूचे वडील म्हणतात- माझी मुलगी जिथे काम करते...

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT