JEE Main NEET 2020 exams in July 
देश

JEE आणि NEET परिक्षेच्या तारखा जाहीर; या तारखेला होणार परिक्षा

वृत्तसंस्था

दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या जेईई मेन्स आणि नीट या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज (ता. ०५) मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मेन्स आणि नीट परीक्षेची तारीख जाहीर केली.

आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. आता जेईई मेन्स परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई अॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ही २६  जुलै रोजी होणार असून, सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्यीची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.

पाकिस्तानच्या इतिहासातील पहिलीच घटना; काय झाले?

देशभरातील लाखो विद्यार्थी या परिक्षांच्या ताराखांच्या प्रतिक्षेत होते. मात्र कोरोनारुपी संकटामुळे आतापर्यंत याबाबत निर्णय होत नव्हता. आज केंद्रीयमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक हे वेबिनारच्या माध्यामातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना देशभरातील विद्यार्थांनी विविध प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

Coronavirus :  'या' राज्यात एका दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त दारू विक्री

दरवर्षी, लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेला प्रवेशासाठी  NEET आणि JEE मेन्स सारख्या परीक्षा देतात. या वर्षी देखील अशाचप्रकारे लाखो विद्यार्थ्यांना या परिक्षेची प्रतिक्षा होती. मात्र, आता तारखा घोषित झाल्याने त्यांना त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT