Hemant Soren 
देश

झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचा 'धुरळा', तर भाजपचा 'पालापाचोळा'

वृत्तसंस्था

रांची : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) सत्तेतून बाहेर जावे लागणार हे निश्चित आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) व राष्ट्रीय जनता दल (राजद) या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत महाआघाडीने 42 जागांवर आघाडी घेतली असून, भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे. 

झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यापासून काँग्रेस आघाडीने मुसंडी मारल्याचे दिसत होते. अखेरपर्यंत हाच ट्रेंड असल्याचे दिसत आहे. बहुमतासाठी आवश्यक 41 जागांचा आकडा महाआघाडी पार करणार हे निश्चित आहे.  जेएमएमच्या हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

झारखंडमध्ये 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. मागील विधानसभेत 37 जागा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला आहे. भाजपने स्वतंत्र्यपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका त्यांना बसल्याचे दिसत आहे. 

झारखंड विधानसभेसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया झाल्यानंतर जाहीर झालेल्या कल चाचण्यांमध्ये राज्यातील भाजप सरकार पुनरागमन करण्याची शक्‍यता धूसर मानण्यात येत होती. कॉंग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राजद आघाडीला 41 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. बिहारचे विभाजन करून झारखंडची 2000 मध्ये निर्मिती झाल्यापासून भाजपचे नेते रघुबर दास हे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले नेते ठरले आहेत. आता मात्र, त्यांना पद सोडावे लागणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रातही नुकतेच भाजपने सत्ता गमाविली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्नीच्या स्टेटसवर अश्लील कमेंटचा जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या; लग्नाच्या वाढदिवशीच संसार उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड 17 मार्चला; पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडी दहाला होणार

Plane Crash Video: नवीन चलनी नोटांनी भरलेले वायुसेनेचं विमान रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा मृत्यू, ३० जखमी, पण लोकांना दिसल्या फक्त नोटा

अग्रलेख : सत्तेची ‘नशा’ उतरवली

Panchang 28 February 2026: आजच्या दिवशी हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण आणि ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT