Argument in JNU and ABVP leaders Argument in JNU and ABVP leaders
देश

JNU : जेएनयूत शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण!

विद्यापीठातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनीच मारहाण केल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू हे विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारसरणीला प्रोत्साहन देणारं आणि हुशार विद्यार्थ्यांचं विद्यापीठं म्हणून ओळखलं जातं. पण याच विद्यापीठात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. स्कॉलरशीप मिळाली नसल्यानं आंदोलन पुकारलेल्या इथल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याची गंभीर बाब घडली आहे. (JNU Staff And Guards Assaulted Students Went To Seek Scholarship Six Injured)

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी आरोप केला की, गेल्या दोन वर्षांपासून आमची स्कॉलरशीप मिळालेली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी आम्ही सोमवारी विद्यापीठात गेलो होतो. पण विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आम्हाला रस्त्यातच अडवलं आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत विद्यार्थी नेत्यासह सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत, असंही या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT