Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi : जाहीरनामा नव्हे ‘जुमला पत्र’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपच्या संकल्प पत्रावर टीका

‘‘लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः ‘‘लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जारी केलेले ‘संकल्प पत्र’ हे खोट्या आश्वासनांचे (जुमला) पत्र’’ आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द भाजपच्या जाहीरनाम्यातून आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून गायब असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

‘‘लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही. दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीची योजना पूर्णपणे स्पष्ट आहे. ३० लाख पदांवर भरती आणि प्रत्येक शिक्षित युवकाला एक लाख रुपये पगाराची पक्की नोकरी, त्यामुळे युवावर्ग यावेळी मोदींच्या आश्वासनाला फसणार नाही. तर काँग्रेसचा हात मजबूत करून देशात रोजगार क्रांती आणणार आहे,’’ असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘‘भाजपचे संकल्प पत्र हा देखावा असून त्यांचा खरा संकल्प राज्यघटना बदलण्याचा आहे. देश, समाज आणि लोकशाही विरोधी सर्व कट भाजप आधी तळातून सुरू करतो. सुरुवातीला त्यांचे नेते जनतेसमोर राज्यघटनेची शपथ घेतात आणि रात्री राज्यघटना संपविण्याची पटक​था लिहिली जाते. सत्ता प्राप्तीनंतर राज्यघटनेवर हल्ला केला जातो. भाजपची राज्यघटना बदलाची मोहीम सर्वांनी एकजूट होऊन हाणून पाडण्याची वेळ आली आहे.’’

‘‘समाजाच्या सर्व घटकांच्या हिताचे काम करण्यात पंतप्रधान मोदी यांना अपयश आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तर भाजपच्या संकल्प पत्राला काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी माफी पत्राची उपमा दिली.‘‘दलित, शेतकरी, युवक आणि आदिवासींची पंतप्रधानांनी माफी मागावी,’’ असेही खेडा म्हणाले.

‘‘महागाईने जनता होरपळून निघाली आहे. गॅस सिलिंडरचे दर ३०० रुपयांवरून १२०० रुपयांवर गेले आहेत. डिझेलच्या किमती ५५ वरून ९० रुपयांवर गेल्या आहेत. खर्च कसा भागवायचा, याची चिंता जनतेला लागली आहे, अशावेळी भाजपने जुमलापत्र सादर केले आहे. भाजपवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही,’’ अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी केली. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल या पक्षांसह अन्य विरोधी पक्षांनीही भाजपच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT