Rana Ayyub
Rana Ayyub सकाळ डिजिटल टीम
देश

लंडन दौऱ्याच्या आडवी आली ED; पत्रकार राणा अय्यूब म्हणाल्या..

सकाळ डिजिटल टीम

लंडनला जात असताना पत्रकार राणा अय्युब यांना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. यासंदर्भात पत्रकार राणा अय्युब यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली.

मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्युब यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राणा अय्यूब यांनी कोरोना काळात मदतीसाठी निधी गोळा करताना विदेशी निधी नियमांचे कथित उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणावर ईडी तपास करत आहे. (Journalist Rana Ayyub was stopped at the Mumbai airport )

राणा अय्युब ट्वीट करत म्हणाल्या “भारतीय लोकशाहीवर भाषण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पत्रकारिता महोत्सवात जाण्यापासून मला रोखण्यात आलं. काही दिवसांपूर्वी मी हे सार्वजनिकपणे जाहीर केलं होतं. मला थांबवल्यानंतर ईडीचे समन्स माझ्या इनबॉक्समध्ये आल्याचं कुतुहूल आहे.”

ईडीने १ एप्रिलला राणा अय्यूब यांना चौकशीसाठी बोलावलंय. राणा अय्यूब यांना कोरोना काळात काळात मदतीसाठी निधी गोळा करताना विदेशी निधी नियमांचे कथित उल्लंघन केल्या प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी सप्टेंबर २०२१ मध्ये एफआयआर दाखल केला होता. याच एफआयआरवर आर्थिक गैरव्यवहाराचे हे प्रकरण समोर आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT