jp nadda.jpg 
देश

बलिया हत्याकांडः आरोपीची बाजू घेणाऱ्या भाजप आमदाराच्या भूमिकेवर जेपी नड्डा नाराज

सकाळ वृत्तसेवा

लखनऊ- बलिया हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्याशी चर्चा करुन आमदार सुरेंद्र सिंह यांना या प्रकरणाच्या तपासापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र सिंह हे नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करुन पक्षाला अडचणीत आणले आहे. 

यापूर्वी बलियामधील बेरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि प्रदेश संघटन महामंत्री सुनील बन्सल यांच्यासमोर आपली बाजू मांडली. बलियातील दुर्जनपूर गावात 15 ऑक्टोबरला एक हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी धीरेंद्र सिंहचे सुरेंद्र सिंह यांनी जाहीर समर्थन केले होते. त्यामुळे पक्षाने त्यांना लखनऊला बोलावले होते. 

आमदार सुरेंद्र सिंह यांना लखनऊ येथील भाजपच्या मुख्यालयात बोलावणे धाडण्यात आले होते. त्यांच्या भूमिकेबद्दल पक्ष नेतृत्त्वाकडून जाब विचारण्यात आला. पक्ष नेतत्त्वासमोर सुरेंद्र सिंह यांनी आपली बाजू मांडली. 

दरम्यान, या हत्या प्रकरणातील आरोपी धर्मेंद्र सिंह हा सुरेंद्र सिंह यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. सुरेंद्र सिंह यांनी धर्मेंद्र सिंहची जाहीरपणे बाजू घेतल्याने पक्ष अडचणीत आला आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्ष संकटात सापडला आहे. 

हे प्रकरण पूर्वनियोजित नव्हते. समोरील बाजूने आधी हल्ला झाला होता. हाणामारीत दोन्ही गटातील लोक जखमी झाले. ही घटना दुर्देवी असल्याचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी पक्ष नेतृत्त्वासमोर सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT