Jyotiraditya Scindia 
देश

Jyotiraditya Scindia : सिंधियांनी ट्विटर बायोवरून 'BJP' ला हटवलं? घरवापसीच्या टोमण्याला दिलं तिखट उत्तर

ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसच्या वाटेवर

धनश्री ओतारी

भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. एका काँग्रेस नेत्यानं सिंधिया यांनी आपल्या ट्विटरवरुन भाजपचं नावं हटवलं असा दावा केला आहे. पण घरवापसीच्या टोमण्याला सिंधीया यांनी तिखट उत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेत्याच्या दाव्यावर सिंधिया यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. "काँग्रेस पक्षाकडे कोणताही मुद्दा नाही. म्हणूनच सकाळ संध्याकाळ फक्त खोटेपणा आणि प्रचार करावा लागतो. माझ्या ट्विटर बायोपेक्षा तुम्ही जनतेचे मन चांगले वाचले असते तर 15 महिन्यांत भ्रष्ट सरकार गेले नसते.

अशा आशयाचे ट्विट करत खोचक टोमणे मारले आहेत. सिंधिया यांच्या ट्विटनंतर काँग्रेस नेते पवन खेडा रिट्विट करत सिंधिया यांना छेडले आहे.

"ये दुनिया मेरे बाबुल का घर, वो दुनिया ससुराल, जा के बाबुल से नजरें मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे? लागा चुनरी में दाग…अशी हिंदी गाण्याची कडवं शेअर करत काँग्रेस नेता खेडा यांनी सिंधिया यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू आमदार लक्ष्मण सिंह यांनी पक्षात ज्योतिरादित्य सिंधिया यांची उणीव जाणवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय गोटात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

2020 मध्ये काँग्रेसविरोधात बंड करून भाजपमध्ये सामील झालेले सिंधिया सध्या केंद्रीय मंत्री आहेत. सिंधिया यांनी काँग्रेस सोडताच मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमतात आले आणि नंतर शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT