Former Madhya Pradesh CM Kamal Nath explaining the real reason behind the fall of the Congress government. esakal
देश

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Kamal Nath News : काँग्रेस सरकार पडण्यामागे नेमकं कोणतं कारण होतं, याबाबत कमलनाथ यांनी विधान केलंय.

Mayur Ratnaparkhe

Kamal Nath on Congress Government Collapse in Madhya Pradesh मध्य प्रदेशच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पाच वर्षानंतर एक मोठा गौप्यस्फोट केलाय. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

कमलनाथ यांनी म्हटले आहे, की त्यांचे सरकार केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे पडले  नव्हते.  तर सरकार प्रत्यक्षात दिग्विजय सिंह चालवत आहेत, असा ज्योतिरादित्य सिंधिया यांचा झालेला समज देखील एक मोठे कारण बनला.

तसेच, कमलनाथ यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली आणि म्हटले की, आता जुन्या गोष्टी उकरून काढण्याचा काही उपयोग नाही, परंतु हे खरे आहे की सिंधियांना वाटले की दिग्विजय सिंह सरकार चालवत आहेत आणि या नाराजीतून त्यांनी काँग्रेस आमदारांना फोडले व सरकार पाडले.

तर काही दिवसांपूर्वीच, दिग्विजय सिंह यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी जेवणादरम्यान, सिंधिया यांनी कमलनाथ यांना ग्वाल्हेर-चंबळशी संबंधित समस्यांची यादी दिली होती. परंतु, त्यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही, तेव्हा सिंधिया यांना वाटले की दिग्विजय सिंह यांचा सरकारवर अधिक प्रभाव आहे.

यानंतर, काँग्रेसची स्थिती बिकट झाली आणि मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत २२ आमदारही गेले. परिणामी काँग्रेस अल्पसंख्याक झाली आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार पुन्हा सत्तेत आले.

कमलनाथ यांचे हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी राज्यातील नवीन जिल्हाध्यक्षांना भेटून काँग्रेसला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, दुसरीकडे, पक्षाचे मोठे नेते पुन्हा जुन्या मुद्द्यांना हवा देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

Pune News : सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की? भेकराईनगर गोशाळा येथील प्रकार

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या २६ लाख लाभार्थी महिलांची सुक्ष्म छाननी; आदिती तटकरे यांची माहिती

Pune Ganeshotsav : ध्वनिक्षेपकाला परवानगी! यंदा सात दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ‘बजाव’

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT