kang.jpg 
देश

...अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा : कंगना रणौत

वृत्तसंस्था

मुंबई : निर्भयाप्रकरणी वरिष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या विधानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने संताप व्यक्त करताना वादग्रस्त विधान केले आहे. अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण तरीही सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवणं तिनं थांबवलेलं नाही. नुकत्याच प्रमोशन प्रेस कॉन्फरन्समध्ये कंगना राणौतला निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींसाठी वकील इंदिरा जयसिंह यांच्या अपीलवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं इंदिरा जयसिंह यांच्यावर थेट निशाणा साधत आपला राग व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे अपील केलं होतं की, सोनिया गांधींनी जसं राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं तसं या आरोपींनाही माफ करायला हवं. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती.

याबद्दलच इंदिरा यांच्या अपीलवर कंगनाला तिचं मत विचारण्यात आलं. यावर कंगना म्हणाली, ‘अशा महिलांनाच या बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवायला हवं. त्यानंतर त्यांना समजेल. इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात. खरं तर या दोषाींना भरचौकात फाशी द्यायला हवी.’ ज्याला बलात्कार माहित आहे तो अल्पवयीन कसा काय

मुंबईमध्ये नुकतीच पंगा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी निर्भया गँगरेप प्रकरणाविषयी कंगनाला प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना कंगनानं या आरोपींना शिक्षा देण्यासाठी केल्या जाणाऱ्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी म्हणजे इतरांना त्यातून कायद्याचा धाक निर्माण होईल असं मतही कंगनानं मांडलं.

या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना कंगना म्हणाली, ''निर्भयाचे आई-वडील एवढ्या वर्षांपासून आपल्या मुलीला गमावल्याचं दुःख सहन करत आहे. अशात या दोषींना शांतपणे मारण्याचा काय फायदा. आपण अशाप्रकारे आरोपींना मारुन कोणतंही उदाहरण सेट करु शकत नाही. त्यामुळे या दोषींना भरचौकात फासावर चढवायला हवं.''

इंदिरा जयसिंह यांच्या विधानानंतर निर्भयाच्या आईने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, “इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत. संपूर्ण देशाची इच्छा आहे की दोषींना फाशी दिली जावी. केवळ यांच्यासारख्या लोकांमुळेच बालत्कार पीडितांना न्याय मिळत नाही.”

दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टानं निर्भया रेप केसमधील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषींना1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT