kanpur  
देश

पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला भर रस्त्यात दिला चोप

सकाळ डिजिटल टीम

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर इथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'पती पत्नी और वो'चा हा किस्सा चर्चेत आहे. पतीने प्रियकरासोबत जात असलेल्या पत्नीच्या गाडीला धडक देऊन थांबवलं. त्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीलाच मारहाण केल्याचा प्रकार घडला.

पती पत्नी आणि प्रियकाराच्या या भांडणामुळे बराच वेळ रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता. लोकांनी याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी येऊन प्रकरण शांत केले. तासभर चाललेल्या या प्रकाराचा व्हिडिओ लोकांनी शूट केला. यातीलच मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पती आणि पत्नी यांच्यामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. यावेळी पतीने पत्नीला दुसऱ्या तरुणासोबत फिरताना पाहिलं तेव्हा त्याला विरोध केला. यानंतर पत्नीने प्रियकरासोबत पतीला रस्त्यावर मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संबंधित महिलेचा पती एका गावाचा सरपंच असून भागात या प्रकाराची चर्चा होत आहे.

याआधी कानपूरमधील हरवंश मोहालमधील एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्यासोबत अफेअर होतं. त्याच्यासोबत पत्नी आईस्क्रीम खाण्यासाठी गेली होती. याची माहिती होताच व्यापारी त्याच्या काही साथीदारांसह तिथं पोहोचला. पत्नीसह प्रियकराला पकडून मारहाण केली होती. यावेळी एका मित्रालासुद्धा चपलाने मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT