women burkha Esakal
देश

Burkha incident in Karnataka:मुस्लिम आहात तर बुरखा घाला, बस ड्रायव्हरनं मुलींना बसमध्ये चढण्यास केला मज्जाव

Girl refused to get in Bus: मुस्लिम मुलीने बुरख्याऐवजी हिजाब घातला म्हणून एका बस ड्रायव्हरने बसमधून उतरुन दिलं. ही बस बसवकल्याण ते कलबुर्गी या मार्गावर चालते.

सकाळ डिजिटल टीम

Burkha incident in Karnataka:कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका बस चालकाने बुरखा परिधान न करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिंनींना बसमध्ये बसण्यास मनाई केली. नागरिकांना ही गोष्ट समजताचं लोकांमध्ये आक्रोश पसरला.

ही घटना तेव्हा घडली, जेव्हा काही विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी कमलापुर तालुक्यातील ओकाली गावातून बसवकल्याण जात होत्या.

ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी काही नागरिक देखील उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की सर्व मुस्लिम विद्यार्थिनींनी बसमध्ये बसण्याआधी बुरखा घातला पाहिजे. ही बस बसवकल्याण ते कलबुर्गी या मार्गावर चालते.

तसेच, काही मुलींनी हिजाब घातला होता, त्या मुलींनाही बसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना सांगण्यात आलं की तुम्हीही बुरखा घाला. चालक म्हणाला की मुस्लिम विद्यार्थिनींसाठी फक्त बुरखाचं स्वीकारण्यासारखा आहे.(Latest Marathi News)

काही माध्यंमांच्या अहवालानुसार, बस चालक विद्यार्थिंनींना म्हणाला की, "जर तुम्ही मुस्लिम असाल तर बुरखा घाला. हिजाब नाही. जेव्हा तुम्ही बुरखा घालालं तेव्हाचं तुम्हाला बसमध्ये चढण्याची परवानगी मिळेलं."

नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका विद्यार्थिनीने सांगितले की चालकाने तिची धार्मिक ओळख जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न विचारले आणि तिला बुरखा घालायला सांगितला. जेव्हा विद्यार्थिनीने नाव सांगण्यास नकार दिला आणि नाव नाही सांगितलं, तर त्याने तिला शिवीगाळ केला आणि बसमधून हाकलून दिलं.(Latest Marathi News)

मागच्या वर्षी कर्नाटकमध्ये हिजाब मुद्द्यावर मोठा संघर्ष बघायला मिळाला होता. त्यावेळी कर्नाटकमध्ये काही शाळकरी मुलींनी शाळेत हिजाब घालून येण्यावर विद्यालय प्रशासनाने आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात वाद बघायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे OBC मधूनच Maratha आरक्षणावर ठाम का? स्वतंत्र आरक्षणाला विरोध का? टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

Service Charge Scam : सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेलमध्ये लूट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर; पाच ते २० टक्क्यांपर्यंत वसुली

Maratha Protest : मराठ्यांच्या वादळाने मुंबईत वाहतूक कोंडी, फ्री वेनंतर जेजे फ्लायओवरही बंद; कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा

Pitru Paksha 2025: यंदा 6 कि 7 सप्टेंबर यंदा पितृपक्ष कधी? एका क्लिकवर सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Marathwada Dams: मोठ्या धरणांच्या साठ्यात दुपटीने वाढ; मराठवाड्यातील स्थिती, मानार, सीना कोळेगाव शंभर टक्के भरले

SCROLL FOR NEXT