Kargil Vijay Divas google
देश

Kargil Vijay Divas : कारगिलच्या थराराची २२ वर्षे; देशभर शहीदांचे स्मरण

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय अंतर्गत पाकिस्तानी सैनिकांचा पराभव केला.

नमिता धुरी

मुंबई : आज २६ जुलै कारगिल विजय दिवस आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे ते जुलै १९९९ दरम्यान कारगिल, जम्मू-काश्मीरमध्ये युद्ध झाले. या युद्धात भारताचा विजय झाला होता. २३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झालेल्या या युद्धात पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाले होते.

लष्कराने घुसखोरांचा खात्मा केला होता. या युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा सन्मान केला जातो.

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय अंतर्गत पाकिस्तानी सैनिकांचा पराभव केला. तेव्हापासून देशाच्या शूर सैनिकांनी दाखवलेल्या अदम्य साहस, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ तो दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

शहीदांचे स्मरण

याआधी १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे. कारगिलचे हे युद्ध ६० दिवसांपेक्षा जास्त चालले. या लढाईला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. या युद्धात पाकिस्तानशी लढताना ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते.

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज सर्व देशवासीय स्मरण करत आहेत. देश त्यांना आदरांजली वाहतो आहे. भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम केला जात आहे.

या दिवशी अनेक लोक रक्तदान करतात. भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. शहीद जवानांच्या शौर्याचे स्मरण करताना संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. अनेक मोठ्या व्यक्तींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू गाठून शहीद जवानांचे स्मरण केले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Satish Golcha: पोलीस आयुक्तांची बदली, नवीन पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेले सतीश गोलचा कोण आहेत? वाचा...

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT