DK Shivakumar esakal
देश

DK Shivakumar : भाजपला धक्का बसणार? अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर, प्रदेशाध्यक्षांचा मोठा गौप्यस्फोट

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) एकूण 224 जागांपैकी 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल.

सकाळ डिजिटल टीम

"माजी आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही विद्यमान आमदारांची यादीही जाहीर करू.''

Karnataka Assembly Election 2023 : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) एकूण 224 जागांपैकी 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी केला आहे.

सत्ताधारी भाजपचे (BJP MLA) अनेक विद्यमान आमदार येत्या काही दिवसांत पक्षात प्रवेश करणार असल्याचंही ते म्हणाले. भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर यांना पक्षात सामील केल्यानंतर डीके शिवकुमार पत्रकारांशी बोलत होते.

म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांच्यासह माजी आमदार जीएन नंजुनदास्वामी आणि विजापूरचे आमदार मनोहर ऐनापूर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2022 च्या गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कर्नाटकमध्ये लवकर निवडणुका घ्यायच्या होत्या, परंतु या निर्णयापासून ते मागं हटले, असा दावाही शिवकुमार यांनी केलाय.

भाजपला वाटतं की जेवढे दिवस त्यांना मिळतील तेवढे ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील. लगेच निवडणुका झाल्या तरी काँग्रेसची तयारी आहे. निवडणूक आयोगानं तातडीनं निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'अनेक भाजप नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार'

शिवकुमार पुढं म्हणाले, "माजी आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. येत्या काही दिवसांत आम्ही विद्यमान आमदारांची यादीही जाहीर करू. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मी आता कोणाचंही नाव सांगणार नाही. नेते बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व स्वीकारत आहेत. जनमत काँग्रेसच्या बाजूनं असल्याचं स्पष्ट झालं आहे."

'काँग्रेस 140 पेक्षा जास्त जागा जिंकेल'

शिवकुमार म्हणाले, "आमच्या आधीच्या सर्वेक्षणात आमच्या जागेचा अंदाज 136 जागांवर होता. मात्र, आता आमचा सर्व्हे 140 जागांचा अंदाज घेत आहे. बदल सुरू झाला आहे. आम्ही तो राज्यभर फिरताना पाहत आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT