Karnataka Assembly Election Ramesh Jarkiholi
Karnataka Assembly Election Ramesh Jarkiholi esakal
देश

'ती' तुम्हाला 3 हजार देत असेल, तर आम्ही एका मतासाठी 6 हजार देऊ; भाजपच्या बड्या नेत्याची मतदारांना 'ऑफर'

सकाळ डिजिटल टीम

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा पक्ष सत्तेवर आला आहे. 2023 च्या निवडणुकीतही आम्ही स्पष्ट बहुमतानं सत्तेवर येऊ, असं मंत्री म्हणाले.

बेळगांव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी पक्षाच्या बाजूनं प्रचार सुरु केला आहे.

दरम्यान, मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपच्या एका नेत्यावर पैशाचं आमिष दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. वृत्तानुसार, भाजप नेते रमेश जारकीहोळी यांनी भाजपला मत दिलं तर एका मतासाठी 6000 रुपये देऊ, अशी ऑफर दिली आहे. मात्र, भाजपनं हा आरोप फेटाळून लावला आहे.

माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्यावर बेळगाव (Belgaum) येथील सभेत मतदारांना पैशाचं आमिष दिल्याचा आरोप आहे. रमेश यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकातील सत्ताधारी भाजपची कोंडी झाली असून या विधानानंतर पक्षानं वेगळी भूमिका घेतली आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, जारकीहोळींनी मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या, आम्ही तुम्हाला 6 हजार रुपये देऊ, अशी खुली ऑफर मतदारांना दिली आहे. सेक्स स्कँडलमधील कथित भूमिकेमुळं रमेश यांना 2021 मध्ये राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आलं होतं.

वृत्तानुसार, रमेश यांच्या समर्थकांनी बेळगावच्या सुळेबावी गावात रॅली काढली होती. यावेळी जारकीहोळींनी काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर शाब्दिक हल्ला करत मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं. आमदार हेब्बाळकर बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तर रमेश हे बेळगावच्या गोकाक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.

रमेश जारकीहोळी म्हणाले, ती (लक्ष्मी हेब्बाळकर) मतदारसंघातील मतदारांमध्ये भेटवस्तूंचं वाटप करताना मला दिसत आहे. आतापर्यंत त्यांनी 1 हजार रुपये किमतीच्या कुकर आणि मिक्सरसारख्या स्वयंपाकघरातील उपकरणांचं वाटप केलं. या सर्वांची मिळून सुमारे 3 हजार किंमत असू शकते. मी तुम्हाला 6 हजार देण्यास तयार आहे. पैसे नाही दिल्यास आमच्या उमेदवाराला मत देऊ नका, असं त्यांनी म्हटलंय.

रमेश यांच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका काय?

कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री गोविंद करजोळ यांनी लगेचच एक निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलंय, आमच्या पक्षात अशा गोष्टींना थारा नाही. आमचा पक्ष एका विचारधारेवर बांधला गेला आहे, त्यामुळंच देशात सत्तेवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा पक्ष सत्तेवर आला आहे. 2023 च्या निवडणुकीतही आम्ही स्पष्ट बहुमतानं सत्तेवर येऊ, असं मंत्री म्हणाले. एखाद्या व्यक्तीनं विधान केलं तर ते पक्षाचं विधान नसून ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT