Crime News Esakal
देश

Crime News: धक्कादायक! नवऱ्याने पत्नीसमोरच दुसऱ्या महिलेवर केला बलात्कार; धर्म बदलण्यासाठी दबाव अन्...

Crime News: २८ वर्षीय विवाहितेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महिलेने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crime News: कर्नाटकात सक्तीचे धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने या प्रकरणात बलात्काराचा आरोप केला असून वैयक्तिक फोटोंच्या मदतीने तिला ब्लॅकमेल करून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही म्हटले आहे. सध्या पीडितेने एका जोडप्यासह ७ जणांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. या संबधीत प्रकरणाचा तपास चालू आहे.

२८ वर्षीय विवाहितेच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं यावरही दबाव टाकण्यात आला. तर रफिक असे आरोपीचे नाव आहे.

रिपोर्टनुसार, रफिक आणि त्याच्या पत्नीने महिलेला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिचे वैयक्तिक फोटो काढले, ज्याच्या मदतीने तो तिला वारंवार त्रास देत धमकावत होता. आरोपींनी महिलेला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याची मागणी केली.

पोलिसांनी सांगितले की, रफिक आणि त्याच्या पत्नीने 2023 मध्ये महिलेला बेलगावी येथे त्यांच्या घरात राहण्यास भाग पाडले आणि त्यांनी तिला जे काही सांगितले त्याचे पालन करण्याची मागणी केली. महिलेने आरोप केला आहे की, गेल्या वर्षी ते तिघे एकत्र राहत असताना रफिकने पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला होता.

रिपोर्टनुसार, बेलगावीचे एसपी भीमशंकर गुलेडा यांनी सांगितले की, या जोडप्याने महिलेला पाच वेळा नमाज अदा करण्यास, बुरखा घालण्यास आणि कुंकु न लावण्यास भाग पाडले होते.

रफिकने महिलेला पतीला घटस्फोट देण्यासही सांगितले होते, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिने हे मान्य केले नाही तर तिचे खाजगी फोटो लीक करू असेही त्याने सांगितले. पोलिसांनी एससी/एसटी कायद्यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT