Karnataka BJP Yuva Morcha Worker Praveen Nettaru Case
Karnataka BJP Yuva Morcha Worker Praveen Nettaru Case esakal
देश

Karnataka : कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या; दक्षिण कन्नड जिल्ह्यात कलम 144 लागू

सकाळ डिजिटल टीम

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) याची निर्घृण हत्या करण्यात आलीय.

Karnataka Government : कर्नाटक सरकारचा आज एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी आज वर्षपूर्तीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द केलाय. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली आहे. भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्यानं भाजपनं (BJP) हा निर्णय घेतलाय.

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) याची निर्घृण हत्या करण्यात आलीय. आज कर्नाटकातील बोम्मई सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, दोड्डबल्लापूरमध्ये विधानसभेचा अधिकृत कार्यक्रम आणि मेगा रॅली 'जनोत्सव' होणार होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हेही या रॅलीत सहभागी होणार होते. मात्र, इथं तणाव वाढू नये म्हणून दक्षिण कन्नड जिल्हा पोलीस हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलंय. सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच सरकारविरोधात नाराजी आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार यांना घेरलंय. यासोबतच काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत.

तत्पूर्वी, बुधवारी मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल आणि हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असं आश्वासन दिलंय. मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पथकं तयार करण्यात आली असून ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. दोषींना लवकरच पकडलं जाईल आणि कठोर शिक्षा करण्यात येईल. मंगळुरू आणि शिवमोग्गा इथल्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्रवीण नेट्टारू (Praveen Nettaru) या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचं दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे भागात पोल्ट्रीचं दुकान होतं. गेल्या मंगळवारी प्रवीण दुकान बंद करून घरी परतत असताना काही दुचाकीस्वारांनी त्याचा मार्ग अडवून प्रवीणवर कुऱ्हाडीनं वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं. या हत्येनंतर कर्नाटकात मोठा तणाव निर्माण झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT