BJP 
देश

कर्नाटकात भाजपचा आज निकाल; येडियुरप्पा सरकार तरणार?

वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकात विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागणार असून, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे भवितव्य ठरणार आहे. सुरवातीच्या कलानुसार 15 पैकी 8 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. येडियुरप्पा सरकार तरणार का, हे आज पाहावे लागणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीत सुमारे 66.49 टक्के मतदान झाले होते. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थैर्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने किमान सहा जागी विजय मिळविणे आवश्‍यक आहे.

जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस आणि जेडीएसमधील 17 आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ 17 आमदारांच्या बडतर्फीनंतर 208 वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT