Congress Leader Siddaramaiah esakal
देश

CM Siddaramaiah : 'ते' सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

१९८३ पासून आजपर्यंत कधीही तडजोडीचे राजकारण केलेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्या मंत्र्याच्या घरी गेल्याचे किंवा त्यांच्याशी तडजोड केल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचे आव्हान दिले.

बंगळूर : आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत तडजोडीचे राजकारण केले नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी स्पष्ट केले. आपण विरोधी पक्षात असताना, कोणत्या मंत्र्याच्या घरी गेल्याचे किंवा त्यांच्याशी तडजोड केल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचे आव्हान दिले.

विधानसभेत राज्यापालांच्या आभारप्रदर्शनाच्या चर्चेत कुमारस्वामी (Kumaraswamy) बोलत असताना मध्येच हस्तक्षेप करून सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले की, आपण १९८३ पासून सभागृहात आहे. माझ्यासोबत बी. आर. पाटील आणि आर. व्ही. देशपांडे यांच्याशिवाय कोणीही सभागृहात नाही. तेव्हापासून आजपर्यंत कधीही तडजोडीचे राजकारण केलेले नाही.

राज्यपालांच्या आभारप्रदर्शनाच्या भाषणावर बोलताना धजद नेते आमदार कुमारस्वामी यांनी ‘गृहज्योती’सह इतर हमींच्या बाबतीत सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे पूर्णत: अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला. तेव्हा भाजपचे सदस्य बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले की, २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वसन दिलात आणि आता अटी का लावत आहात.

चर्चेत हस्तक्षेप करून मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हणाले की, ‘‘यत्नाळ तुम्ही चांगले संसदपटू आहात. तुम्ही उभे राहिल्यास तुम्हाला विरोधी पक्षनेते केले जाईल, असा तुमचा समज झाला आहे. पण माझ्या माहितीनुसार तुम्हाला विरोधी पक्षनेते केले जाणार नाही.’’

‘तोपर्यंत १७० रुपये देत राहणारच...’

‘गृहज्योती’ योजनेअंतर्गत एक वर्षाची सरासरी गृहीत धरून २०० युनिटपर्यंत मोफत दिले जात आहे. ‘अन्नभाग्य’ अंतर्गत आम्ही एक कोटी २८ लाख कुटुंबातील चार कोटी ४८ लाख लाभार्थ्यांना १० किलो तांदूळ देईपर्यंत डीपीटीच्या माध्यमातून आमही १७० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करत राहणार आहोत, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT