Basavaraj Bommai esakal
देश

Karnataka : मुख्यमंत्रिपदाची 'खुर्ची' 2500 कोटींना विकली; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

'भाजप पुढील विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवेल.'

सकाळ डिजिटल टीम

'भाजप पुढील विधानसभा निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवेल.'

कर्नाटकात विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) जवळ आल्याने राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी असल्याचा आरोप काँग्रेसनं (Congress) केलाय. यासोबतच निवडणुकीपूर्वी पक्ष नेतृत्वात बदल करेल, असा दावाही त्यांनी केलाय. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद (BK Hariprasad) म्हणाले, कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांची (Chief Minister in Karnataka) खुर्ची 2,500 कोटींना विकली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केलाय.

हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मंत्री प्रभू बी चौहान म्हणाले, बीके हरिप्रसाद आणि सिद्धरामय्या यांसारख्या काँग्रेस नेत्यांना अशी विधानं करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे आणि त्यांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे. खासदार असलेले आणि केंद्रीय राजकारणात असलेल्या बीके हरिप्रसाद यांच्यासारख्या नेत्यांनी जबाबदारीनं वक्तव्ये करावीत, असंही ते म्हणाले.

ही सर्व विधानं निराधार असून कर्नाटकात अशी कोणतीही चर्चा झालेली नाहीय, असं चौहान म्हणाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) चांगले काम करत असून ते कायम मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप पुढील विधानसभा निवडणुका लढवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस आमदाराच्या या आरोपांनंतर, राज्यानं पुन्हा एकदा कर्नाटकातील भाजप आमदार बसगौडा यत्नाळ यांच्या दाव्याची आठवण करून दिली. त्यांनी म्हटलं होतं की, त्यांना राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी 2500 कोटी रुपये देण्यास सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकात मोठा राजकीय वाद सुरू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Shirur News : थंडावा शोधताना काळाचा घाला; कवठे येथे मुलांसोबत पोहायला गेलेल्या वडिलांचा बुडून मृत्यू

Waste Management Project : कचरा प्रकल्पातून आर्थिक नुकसान टाळा; विरोधीपक्ष नेत्यंची आयुक्तांकडे मागणी

Bridge Collapse : आमणोली येथील प्रवासी पूल कोसळला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, दोषींवर कारवाईची मागणी

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

SCROLL FOR NEXT