DK Shivkumar Refused to Covid Test google
देश

'मी ठणठणीत आहे, नमुने देणार नाही', काँग्रेस नेत्याचा कोरोना चाचणीस नकार

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रॉनचे पहिले रुग्ण देखील कर्नाटकातच (India Omicron Cases) आढळून आले होते. तरीही कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुखांनी (Karnatak Congress Leader) कोरोना चाचणी करण्यास नकार दिला आहे. मी एकदम ठणठणीत असून कोरोना चाचणीसाठी (Corona Testing) माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही, असं डॉक्टरांना म्हटलं. त्यामुळे कर्नाटकात कोरोनावरून राजकारण तापलं आहे.

'मला देशातील कायदा माहिती आहे' -

कोरोनाच्या रँडम चाचण्या करताना एक डॉक्टर डी. के. शिवकुमार यांच्या शिबिरात पोहोचले आणि त्यांना कोरोना चाचणीसाठी नमुने देण्यास सांगितले. तेव्हा शिवकुमार यांनी नकार दिला. ''मी लोकप्रतिनिधी असून काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना कळवू. मी ठणठणीत आहे. तुम्ही कोरोना चाचणीसाठी माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मला देशातील कायदा माहिती आहे. तुमच्या मंत्र्यांना सांगा की मी ठीक आहे. मी चाचणीसाठी नमुने देत नाही आणि त्याची गरज नाही'', असं शिवकुमार म्हणाले.

काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल -

विरोधी पक्षाने मेकेदातु पेयजल वॉटर प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी भाजप सरकारवर दबाव टाकण्यासाठी बंगळुरुसह आजुबाजुच्या जिल्ह्यात गर्दी जमवली. तसेच काँग्रेस नेते आमि हजारो कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले, असा आरोपी सत्ताधारी भाजपने केला आहे. तसेच काँग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी केली टीका -

देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मला काँग्रेस प्रमुखांची दया येते. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. पण, ते आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका करत आहेत. देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना एक प्रमुख व्यक्तीनं हे बोलणं अशोभनीय आहे, असंही बसराज बोम्मई एनडीटीव्हीसोबत बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT