Karnataka Congress State President DK Shivakumar esakal
देश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडकणार ED च्या कचाट्यात; डीकेंना 7 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावणं!

'मी ईडीसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती, पण..'

सकाळ डिजिटल टीम

'मी ईडीसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती, पण..'

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयानं (ED) कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (Karnataka Congress State President DK Shivakumar) आणि त्यांच्या भावाला 7 ऑक्टोबरला चौकशीसाठी दिल्लीत बोलावलं आहे.

यापूर्वी डीके यांनी ईडीसमोर वेळेची मागणी केली होती. मात्र, ती ED नं फेटाळली होती. ईडीच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी याबाबत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय. कर्नाटकच्या काँग्रेस नेत्यांनी यंग इंडिया प्रायव्हेट (National Herald Case) लिमिटेडला निधीच्या संशयास्पद योगदानासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं हे समन्स जारी केलं आहे.

यामध्ये काँग्रेसचे कर्नाटक प्रमुख डीके शिवकुमार आणि त्यांचे भाऊ आणि खासदार डीके सुरेश यांच्या नावाचा समावेश आहे. कर्नाटकच्या या दोन काँग्रेस नेत्यांना ईडीनं शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी दिल्लीत बोलावलंय. ईडीच्या या समन्सबाबत डीके शिवकुमार म्हणाले, 'मी ईडीसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, ती त्यांनी फेटाळली आहे. याबाबत मी आमच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT