Will DK Shivakumar become Karnataka CM

 

esakal

देश

Karnataka Congress Crisis : कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! 15 मे रोजी डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ? आमदाराच्या दाव्याने खळबळ

Will DK Shivakumar become CM? : कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग आला असून, आमदार इक्बाल हुसेन यांनी १५ मे रोजी डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना दररोज नवे वळण मिळत असताना, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय (D.K. Shivakumar next Karnataka CM) आणि रामनगरचे आमदार इक्बाल हुसेन यांनी मोठा दावा करत राजकारणात खळबळ उडवली आहे. ‘१५ मे रोजी शिवकुमार मुख्यमंत्री होतील, ही अंतिम तारीख आहे’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

रामनगर तालुक्यातील केतुहळ्ळी गावात बोलताना हुसेन म्हणाले, ‘याआधी दोन-तीन वेळा तारखा सांगितल्या होत्या. पण, यावेळी ठामपणे सांगतो की, १५ मे रोजी शिवकुमार मुख्यमंत्री बनतील. त्यांना सत्ता मिळावी ही केवळ माझी इच्छा नसून, अनेक आमदार आणि जनतेचीही अपेक्षा आहे.’’

वाढदिवशी ‘सीएम पद गिफ्ट’?

१५ मे हा शिवकुमार यांचा वाढदिवस आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ मिळणार का, असा प्रश्न विचारल्यावर हुसेन म्हणाले, आमची सर्वांचीच ती इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवशी सत्तेचे गिफ्ट मिळावे, ही अपेक्षा आहे. त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत, त्यांचे नेतृत्व राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

मंत्री सतीश जारकीहोळी आणि एच. सी. महादेवाप्पा यांच्या दिल्ली भेटीबाबत बोलताना हुसेन म्हणाले, ‘ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. हायकमांडला भेटणे यात काही चुकीचे नाही. ते राज्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किंवा वैयक्तिक बाबी मांडण्यासाठी गेले असतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Wall Collapse : पावसापासून वाचण्यासाठी भिंतीचा आसरा घेतला अन् काळानं घाला घातला! अंगावर भिंत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी अंत, दोन लहान मुलांचाही समावेश

MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

घर नाही, पाणी नाही… तरीही एल्फिन्स्टन पूल बाधितांवर स्थलांतराचा तगादा! पुनर्वसनावरून वाद पेटला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT