Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Politics : निवडणूक जिंकण्यासाठी अमित शहांचा 'मास्टर स्ट्रोक'; 'या' बड्या नेत्याच्या घरी बोलवली महत्वाची बैठक

कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते सातत्यानं राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, त्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते सातत्यानं राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

याच क्रमानं गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (शुक्रवार) माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांचं येडियुरप्पा आणि त्यांचा मुलगा विजयेंद्र यांनी स्वागत केलं.

शाहांनी घेतला निवडणुकीचा आढावा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांच्या घरी भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळच्या नाश्त्यासोबतच अमित शाहही या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. यासोबतच मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेतला.

भाजप नेत्यांची अमित शाहांशी चर्चा

या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हेही सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह, खासदार नलिन कुमार कटील, कॅबिनेट मंत्री गोविंद करजोला आणि येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

येडियुरप्पांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

फेब्रुवारीमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. विधानसभेतील शेवटच्या भाषणात ते म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, माझ्या पक्षाला विजयी करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. भाजपला पुन्हा विजय मिळवून देणं हेच आपलं एकमेव ध्येय असून यावेळीही भाजपचाच विजय होईल, अशी खात्रीही त्यांनी दिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT